पुणे बंधन कोणतेही असो मग ते परंपराचे बंधन असो, कायद्याचं बंधन असो, सत्तेचं बंधन अथवा वेळेच बंधन असो ते बंधन तोडता आलं पाहिजे. जनावर बंधनात राहतात पण बंधनाचे पाश तोडणारे हे खरे पुरुषार्थी असतात, असे प्रतिपादन प. पु. प्रवीणऋषीजी म. सा. यांनी केले.
परिवर्तन चातुर्मास विषय २०२५ मध्ये आयोजित प्रवचनमालेत त्यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.
प. पु. प्रवीणऋषीजी म. सा. पुढे म्हणाले, ‘बंधन तुमचं आकाश तुमच्यापासून हिरावून घेऊ शकतं. म्हणूनच दुर्भाग्याच्या बंधनांना तोडणं गरजेचं असतं. जे बंधन तोडू शकतात त्यांच्यासाठी सौभाग्याची दारं कायमच उघडलेली असतात. दुर्भाग्याला सौभाग्यात बदलणारे हे स्वतःच्या भाग्याचे मालक असतात. पण दुर्भाग्यात जगणारे मात्र दुर्भाग्याचे गुलामच बनून राहतात. दुर्भाग्याला तोडून सौभाग्यशाली बनतात त्यांच्या जीवनात आनंदाची फुलं उमलतात. यालाच अनुसरून त्यांनी कुलसुरज तिलोक ऋषी यांच्या स्मरणदिनी त्यांची कथा सांगितली.
प. पु. प्रवीणऋषीजी म. सा. पुढे म्हणाले, गुरु तोच असतो जो प्रश्नांचा स्वीकार करतो. त्याचप्रमाणे गुरुंनी देखील त्यांच्या प्रश्नांचा स्वीकार केला. कवी रचनेत काल्पनिक रचना असते आणि आपल्या साधू जीवनाच व्रत हे महासत्याचं आहे. त्यामुळे साधू जीवनाला दोष लागू शकतो. तिलोक ऋषीनी हे जाणून घेत आपल्या गुरूला वंदन केले आणि म्हणाले मी कोणतीही काव्य कल्पना न करता फक्त सिद्धांतांनाच काव्यात रूपांतर केलं तर आपण मला आशीर्वाद द्याल का? गुरु शिष्याच्या निर्मळ नात्याने, विश्वासाने तिलोक ऋषींनी आगामच्या कोणत्याही नियमांना धक्का न लावता ७०००० रचना केल्या. याचाच अर्थ जरी आकाशात भरारी घ्यायची असली तरी मर्यादेचे उल्लंघन न करता ती घेता आली पाहिजे.






















