लासलगाव, (आसिफ पठाण) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रा.से.यो., रा.से.यो. +२ स्तर, एन.सी.सी. आणि माजी विद्यार्थी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन नूतन विद्या प्रसारक संस्थेचे संचालक आणि माजी विद्यार्थी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.हसमुखभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, जनकल्याण रक्तपेढीचे आदित्य श्रीवास्तव, माजी विद्यार्थी संघाचे सदस्य श्री.किशोर गोसावी, श्री.उज्वल शेलार, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रदीप सोनवणे, डॉ.संजय शिंदे,.देवेंद्र भांडे, सुनिल गायकर तसेच जनकल्याण रक्तपेटीचे डॉक्टर आणि वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. शिबिरात 1030 विद्यार्थीनींची मोफत हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल गायकर आणि प्रास्ताविक उज्वल शेलार यांनी केले तर आभार डॉ.प्रदीप सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी यांनी परिश्रम घेतले.
लासलगाव महाविद्यालयात हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन






















