महानगरपालिका मुख्यालयात आज सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत मनपा आयुक्त मनिषा खत्री, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. अवळकंठे, नगररचना उपसंचालक दीपक वराडे, कार्यकारी अभियंता सचिन जाधव व शहर विकास अधिकारी प्रशांत सोनवणे यांची उपस्थिती होती.”एकिकृत विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावलीतील 3.8.2″ नुसार अल्प उत्पन्न गटासाठी घरांची उपलब्धता, भूखंड आरक्षण, म्हाडाची लाभार्थी यादी, TDR मोबदला, तसेच BPMS प्रणालीद्वारे माहितीचे डिजिटायझेशन यासारख्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.ही बैठक परवडणाऱ्या गृहनिर्माणाच्या दिशेने मनपाचे सकारात्मक पाऊल असल्याचे नगर नियोजन विभागाने स्पष्ट केले आहे.


























