स्टार स्प्रिंग्स अँड डायमंड स्प्रिंग्स कंपनीचे डायरेक्टर महेंद्र उर्फ मनीष जाधव यांचा वाढदिवस यंदा अत्यंत पर्यावरण पूरक आणि सामाजिक जाणीवेने साजरा करण्यात आला. त्यांचे चिरंजीव विश्वरूप महेंद्र उर्फ मनीष जाधव आणि बहिरू चौधरी तसेच स्टार स्प्रिंग ची सर्व टीम यांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला.विश्वरूप जाधव यांनी आपल्या वडिलांना अनोखं गिफ्ट देत 155 झाडांची वृक्षारोपण केली.या वृक्षारोपणात ऑक्सिजन पुरवणाऱ्या व निसर्ग पूरक झाडांचा समावेश असून, केवळ वृक्षलागवड न करता त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारीही विश्वरूप यांनी स्वतःवर घेतली आहे. हा उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी एक सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश देणारा ठरतो.या विशेष उपक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये सानिका ऑटो इंडस्ट्रीजचे डायरेक्टर सोपान एंडाईत, पावर मेटल कंपनीचे डायरेक्टर राजेश वारुडे, रिलीफ सर्जिकल कंपनीचे डायरेक्टर बारसोडे साहेब आदींचा समावेश होता. वृक्षारोपणाचे हे कार्य ऐतिहासिक पांडवलेणी परिसरात पार पडले.या उपक्रमामुळे महेंद्र उर्फ मनीष जाधव भावूक झाले. त्यांनी आपल्या चिरंजीवाच्या या सामाजिक बांधिलकीचे मन:पूर्वक कौतुक केले. तसेच, स्टार स्प्रिंग्स अँड डायमंड स्प्रिंग्स कंपनीतील सर्व कर्मचारी वर्गाने देखील महेंद्र उर्फ मनीष जाधव यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.पर्यावरण संरक्षणाचा आदर्श घालून देणारा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणास्त्रोत ठरला
चिरंजीवकडून अनोखं गिफ्ट – महेंद्र उर्फ मनीष जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त 155 वृक्षांची भव्य लागवड!
oplus_6291456


























