*जनता विद्यालय खोपोली येथे क्रीडा क्षेत्रात कु तन्वीष प्रदिप सताणे याला प्रथम

 

क्रमांकाचा सन्मान प्रदान*: दरवर्षी प्रमाणे यावर्षा सुद्धा खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ जनता विद्यालय पुर्व प्राथमिक शाळा खोपोली येथे (लहान शिशु जुई) शालेय भव्य क्रीडा स्पर्धा २०२५ बुधवार दि.१७/१२)२०२५ रोजी सकाळी ११.३० ते ३.३० या वेळेत आयोजित करण्यात आले होते यावेळी (लहान शिशु जुई) अनेक क्रीडा क्षेत्रातील मा.मुख्याध्यापक सौ.समिक्षा ढोके , वर्गशिक्षक सौ.ज्योती साळवी, शिक्षिका सौ.अपर्णा गिरी तसेच सर्व मा.शिक्षक वर्गानी विशेष मेहनत घेऊन सराव कसोशीने करवून घेऊन अनेक मुलांच्या मनापासून आवडीच्या खेळांच्या स्पर्धा सादर करण्यात आल्या त्यामध्ये पालकांनी अतिशय उत्तम रित्या मुलांना भरघोस प्रोत्साहन देऊन अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद देण्यात आला जनता विद्यालय पुर्व प्राथमिक शाळा खोपोली येथे शालेय भव्य क्रीडा स्पर्धा २०२५ सादर करतेवेळी प्रथम क्रमांकाचा सन्मान लहान शिशु जुई कु. तन्वीष प्रदिप सताणे यांस प्रदान करण्यात आला यावेळी मा .मुख्याध्यापिका सौ.समिक्षा ढोके मॅडम , वर्गशिक्षिका सौ.ज्योती साळवी मॅडम, शिक्षिका सौ.अपर्णा गिरी मॅडम, यांच्या शुभ हस्ते गोल्ड मेडल आणि प्रशस्ति सन्मान पत्रक समस्त मा.शिक्षक वर्ग आणि असंख्य विद्यार्थीच्या उपस्थितीत सन्मान प्रदान करण्यात आला यावेळी शालेय भव्य क्रीडा स्पर्धा समारोप झाल्यानंतर जनता विद्यालय पुर्व प्राथमिक शाळा खोपोली मा.मुख्याध्यापिका मॅडम सौ.समिक्षा ढोके, विशेषकरून आभार व्यक्त करण्यात आले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *