मुंबई (प्रतिनिधी) – श्रमण संघीय जैन दिवाकरिय चौथमलजी म.सा. व आचार्य सम्राट ध्यानयोगी परमपूज्य शिवमुनिजी म.सा. यांच्या आज्ञेनुसार, त्यांचे सुशिष्यगण ठाणा-२ संघातील महानुभाव आशुकवि कमलेशजी म.सा. यांच्या शिष्या – स्पष्ट वक्ता दिवाकर गौरव विश्वासजी म.सा. ‘अरमान’, स्वाध्यायप्रेमी आरजुजी म.सा. ‘प्रज्ञा’ आदी साध्वी भगवंतांचा वर्षावास शांताक्रूझ (पूर्व), मुंबई येथे साजरा होणार आहे.
या चातुर्मास पर्वात, अध्यात्म, धर्म, ध्यान, त्याग, स्वाध्याय व साधना यांच्या गंगोत्रीचा अविरत प्रवाह वाहणार असून, जिज्ञासू श्रद्धालूंना आत्मकल्याणाचा अमूल्य लाभ मिळणार आहे.
संघाच्या या चातुर्मासिक प्रवासात, जीवनात सात्त्विकता, संयम, सेवा आणि सदाचाराचे बीज पेरले जाणार आहे. साध्वी भगवंतांचे प्रवचन, धर्मसभा, स्वाध्याय, जप–तप, त्याग आराधना इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
मुंबईतील जैन समाजात या चातुर्मासाबाबत विशेष उत्सुकता असून, भाविक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.
शांताक्रूझसारख्या महानगरात धर्माची व आध्यात्मिकतेची वात्सल्यसिंचित गंगा वाहण्यासाठी हा चातुर्मास पर्व अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे.
मुंबईतील शांताक्रूझ (पूर्व) कमलेशजी यांचा– धर्म, ध्यान व त्यागमयी जीवनगंगेचा प्रवाह


























