पुणे : समाजसेवा, धर्मसेवा व संघटनात्मक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे श्री नितीनजी हरकचंदजी ओस्तवाल यांची जय आनंद ग्रुप, पुणे या प्रतिष्ठित संस्थेच्या अध्यक्षपदी वर्ष २०२५–२६ साठी एकमताने निवड करण्यात आली आहे.
श्री नितीनजी ओस्तवाल हे श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ, पुणे चे सह-कोषाध्यक्ष तसेच जैन कॉन्फरन्स पंचम झोनचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून विविध सामाजिक, धार्मिक संस्थांमध्ये त्यांचे सक्रिय योगदान आहे.
अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी पुढील कार्यकारी पदाधिकार्यांची घोषणा केली:
कार्यकारी अध्यक्ष: श्री गणेशजी कटारिया
सचिव: श्री आनंदजी कोठारी
कोषाध्यक्ष: श्री दिलीपजी धोका
हे सर्व पदाधिकारी मागील चार वर्षांपासून संस्थेत विविध जबाबदार्या यशस्वीरित्या पार पाडत आहेत.
जय आनंद ग्रुप या संस्थेचा हा ३१ वा वर्ष सुरू आहे. ‘संघटन – सेवा – सहयोग’ या त्रिसूत्री ध्येयासह संस्था धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे.
या नव्या कार्यकारिणीच्या निवडीमुळे संस्थेच्या कार्यात अधिक व्यापकता येईल आणि समाजाच्या हितासाठी नव्या दिशा निर्माण होतील, असा विश्वास संस्थेच्या सदस्यांनी व्यक्त केला.
आनंद ग्रुप पुणे च्या अध्यक्षपदी उदयोगपती नितीन ओस्तवाल

























