निफाड/प्रतिनिधी
पिंपळगाव बसवंत येथील पिंपळगाव हायस्कूल विद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी नितीन जनार्दन डोखळे यांच्या मागील दहा वर्षातील उत्कृष्ट कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य एन. सी. सी. वेलफेअर बोर्ड संघटनेच्या वतीने नुकताच मुंबई येथे ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट एन. सी. सी. अधिकारी 2025’ हा सन्मान मा. ब्रिगेडीअर शिरीष ढोबळे, कॅप्टन मनोज भामरे, प्राचार्या सुमन सिंग,प्रमोद जगताप, विदुला साठे व विशवनाथ पांचाळ आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व सेवा मेडल, शाल,श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्षा मंगला जाधव,उपाध्यक्ष उपाध्यक्ष भास्कर बनकर,सेक्रेटरी अविनाश देशमाने, जॉ.सेक्रेटरी अरुण महाले, शिक्षक नेते शिवाजीराजे निरगुडे, माजी एनसीसी ऑफिसर आर डी जाधव, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस बी जाधव, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका फरजाना शेख, उपमुख्याध्यापिका हेमलता जाधव, बी एस रायते पर्यवेक्षिका सुनंदा रसाळ, सुनिता जाधव व सर्व शिक्षक,शिक्षिका यांनी नितीन डोखळे यांचे अभिनंदन केले.
फोटो आहे…..


























