*जिजामाई प्राथमिक विद्या मंदिर, खडके स्काफ पथकाने बाहय मुल्यांकनासाठी शाळेला भेट* .

स्काफ पथकाच मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांनी ढोल वाद्यासह स्वागत केले.

विद्यार्थ्यांनी परिपाठने सुंदर अशी सुरवात केली. त्यानंतर पथक प्रमुख, पथक सदस्य, शिक्षक स्टॉप यांची सभा घेण्यात आली. क्षेत्रे मानके, स्तर याविषयी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले पथक प्रमुखांनी .वर्गाना भेट देवून पाठाचे निरिक्षण केले. व शिक्षकांशी चर्चा केली. वर्गातील विद्यार्थ्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात मुलाखती घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला. शालेय परिसराची सुद्धा पाहणी करण्यात आली.

शालेय परिसरातील झाडे, बगीचा, स्वच्छता, तसेच परसबाग यांची पाहणी केली. शाळेचे मैदान, शौचालय, किचन शेड, पिण्याची पाणी इ. अनेक बाबींची पाहणी केली गेली. व त्यानंतर त्यांनी मुल्यांकन केले.

बाह्य मूल्यांकनातील मानकांमध्ये योग्य पुरावे व अभिलेख यांची पडताळणी करून त्यात काही गुणांची वाढ करण्यात आली आहे. बाहय, मुल्यांकनात एकूण गुणांमध्ये वाढ होऊन शाळेची श्रेणी सुद्धा बदल झाली आहे.

स्कॉफ पथक प्रमुख म्हणून साकेगाव येथील केंद्रप्रमुख सुनील मोरे तसेच विजय देवरे, अजय चालसे, राहूल पाटील यांनी कामकाज पाहिले. जिजामाई प्राथमिक विद्यामंदिर येथील मुख्याध्यापक श्री संजय रविंद्र साखरे, व ज्ञानदेव पाटील निलेश महाजन व सौ. निलिमा फेगडे यांनी स्कॉफच्या पथकातील सदस्यांचे स्वागत केले. व त्यांनी शाळा मूल्यांनकनासाठी जे मार्गदर्शन केले त्याबद्दल संपूर्ण टिमचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *