चांदवड (कीर्ती गुजराथी)
येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम (जैन गुरुकुल) संचलित श्रीमती के. बी. आबड होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्रीमान आर. पी. चोरडिया हॉस्पिटल येथे सोमवारी दि. १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा झाला. एड्स आजाराविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांंनी जनजागृतीपर प्रबोधन पथनाट्य सादर केले. त्यात विविध विचार व प्रतिबंधात्मक उपाय सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, प्रबंध समिती अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, अरविंदकुमार भन्साळी, जवाहरलाल आबड, महाविद्यालयाचे समन्वयक नंदकुमार ब्रम्हेचा, डॉ. सुनीलकुमार बागरेचा, सुमतीलाल सुराणा, डॉ. विवेक जैन, डॉ. आकाश जैन, पंकज चोपडा, यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. अजय दहाड, उपप्राचार्य डॉ. संगीता दोषी यांनी या आजाराविषयी सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. ब्राह्मणे यांनी केले. तर डॉ. वानखेडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते.
————-
फोटो- १) चांदवड येथील होमिओपॅथी वैद्यकिय महाविद्यालयात जनजागृतीपर पथनाट्य सादर करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक. समवेत प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी.
२) चांदवड येथील होमिओपॅथी वैद्यकिय महाविद्यालयात जागतिक एडस् दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी.


























