*सोलापूर जिल्हातील अनगर नगरपंचायतची पुनरावृत्ती आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात पहिला मिळणार*

➡️भाजपचे लोकप्रिय आमदार सुरेश आण्णा धस यांच्या लोकप्रियतेमुळे काही जिल्हापरिषद गट व पंचायत समिती सदस्य बिनविरोध होणार?
पाटोदा *(गणेश शेवाळे)* आष्टी–पाटोदा–शिरूर मतदारसंघात पुन्हा एकदा अनगर नगरपंचायतीची राजकीय पुनरावृत्ती दिसू लागली असून, भाजपचे लोकप्रिय आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढत्या प्रभावामुळे काही जिल्हा परिषद गट व पंचायत समिती सदस्य बिनविरोध निवडून येण्याची शक्यता अधिक मजबूत होत आहे.
मतदारसंघात गेल्या काही वर्षांत आमदार धस यांनी केलेल्या वेगवान विकासकामांमुळे, तसेच सर्वसामान्य माणसाच्या सुख–दुःखात सहभाग असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. गावागावातील लोकसंपर्क, सतत उपलब्ध राहण्याची वृत्ती, समस्यांना दिलेली तातडीची दखल आणि मतदारांशी असलेली घट्ट नाळ या सर्व गोष्टींमुळे विरोधकांची पकड ढासळताना दिसत आहे.
स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा अशी की, “विकासाला विरोध नको” या भावनेमुळे अनेक ठिकाणी पॅनेल तयार होतानाच विरोधक माघारी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनगर नगरपंचायतीत जसा निर्विरोधतेचा संदेश देशभर पोचला होता, तशीच परिस्थिती आता आष्टी–पाटोदा–शिरूरमध्ये निर्माण होत असून बिनविरोधतेची लाट उमटत असल्याचे मानले जात आहे.
राजकीय जाणकारांचे मत असे की धस यांची सरळ–सोप्या भाषेतील जनसंपर्क शैली,
प्रश्न सोडवण्याची जलद गती,
विकासकामांची दृश्यमानता,
आणि सामान्य माणसात तयार झालेला विश्वास या सर्व कारणांमुळे विरोधकांपेक्षा जनतेचा झुकाव अधिक प्रमाणात आमदार धस यांच्या नेतृत्वाकडे आहे.आगामी ZP आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये याच लोकप्रियतेचा परिणाम दिसेल आणि काही गटांमध्ये बिनविरोध निवडणुका होण्याची शक्यता अतिशय जास्त असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळातील विश्लेषण सांगते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *