चांदवड (कीर्ती गुजराथी)
चांदवड येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री दत्त जयंती सप्ताह निमित्त सौ. हर्षदा नितीन खुटे यांनी श्री दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची अप्रतिम रांगोळी साकारली. या रांगोळीसाठी सौ. खुटे यांनी सुमारे तेरा तासांची मेहनत घेतली. हुबेहूब छायाचित्र वाटावे अशी अप्रतिम काढलेली रांगोळी पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. श्री स्वामी समर्थ केंद्र येथे दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
—–
फोटो – चांदवड येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री दत्त जयंती सप्ताह निमित्त सौ. हर्षदा नितीन खुटे यांनी साकारलेली श्री दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची अप्रतिम रांगोळी.


























