गोपाळकुमार कळसकर
तालुका प्रतिनिधी,भुसावळ
भुसावळ : आंतरराष्ट्रीय नामांकन (आय एस ओ 2015) प्राप्त “डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया”द्वारा आयोजित ‘ राष्ट्र गौरव पुरस्कार 2025’ साठी आयुध निर्माणी वरणगाव येथील गोपाळकुमार कळसकर यांची निवड करण्यात आलीआहे. पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी गोपाळकुमार कळसकर यांना हा अवार्ड प्रदान करण्यात येणार आहे. दैनिक कर्णधार वृत्तपत्र, हिंदी मराठी पत्रकार संघ व डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया यांच्या द्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी “राष्ट्र गौरव पुरस्काराचे” आयोजन करण्यातआले आहे. यामध्ये पत्रकारिता, शिक्षण, साहित्य, सामाजिक, खेळ, राजकीय, सौंदर्य, डॉक्टर , वकील ,महिला, सहकार, पतसंस्था, कला , इत्यादी क्षेत्रात कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. गोपाळकुमार कळसकर यांनी साहित्य, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. निर्भीड व निष्पक्ष पत्रकारिता व शोषित, वंचिताना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न अशा विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची “राष्ट्र गौरव पुरस्कार 2025” करिता डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया तर्फे निवड करण्यात आली. नोव्हेंबर 2025 मध्ये मलकापूर येथील भातृ मंडळ हॉलमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तिथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार्थिना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र ,मेडल आदी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.या निवडीबद्दल सर्व पुरस्कार्थींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


























