लासलगाव (आसिफ पठाण)
लासलगाव येथील श्री महावीर विद्यालयात जिल्हा परिषद नाशिक आणि आदित्य बिर्ला ग्रुप, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचे सामाजिक व मानसिक आरोग्य या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा विद्यालयाच्या विद्यार्थी सुरक्षा समिती अंतर्गत संपन्न झाली.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक उपशिक्षक स्वप्निल मुसळे यांनी केले. आदित्य बिर्ला ग्रुपचे जिल्हा समन्वयक उत्तम कासार आणि तालुका संवाद मित्र दिपाली मंडलिक यांनी यावेळी विद्यार्थ्यांना विद्यार्थी सुरक्षा आणि शालेय जीवनात घ्यावयाच्या काळजीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे इयत्ता १० वी चे सर्व विद्यार्थी, प्राचार्या पल्लवी चव्हाणके, पर्यवेक्षक शिवाजी धुमाळ, उपशिक्षक सतिष पवार, योगेश जैन तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपशिक्षक भगीरथ सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
संस्थेचे कार्याध्यक्ष जवाहरलाल ब्रम्हेचा, मानद सचिव शांतीलाल जैन, खजिनदार अजय ब्रम्हेचा यांच्यासह संस्थेचे संचालक आणि पालक प्रतिनिधींनी या उपक्रमाबद्दल कौतुक व्यक्त केले.
*श्री महावीर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सामाजिक व मानसिक आरोग्यावर कार्यशाळा संपन्न*


























