मागील सलग दहा वर्षापासुन इयत्ता १० वी बोर्ड परिक्षेचा १००% निकाल तर १२ वी कला व विज्ञान शाखेसह बोर्ड परिक्षेचा सुध्दा ९५% पेक्षा अधिक निकालाची उत्कृष्ठ परंपरा.
श्री महेंद्र बेराड सर (भोकरदन तालुका प्रतिनिधी)
वालसावंगी – ग्रामीण भागात मराठी भाषेबरोबरच जागतिक भाषा असलेली इंग्रजी या भाषेवर सुध्दा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची पकड निर्माण व्हावी म्हणुन मराठी बरोबरच इंग्रजी भाषेचे दर्जेदार शिक्षण आपल्या गावातच मिळावे हा हेतु समोर ठेवून सन्माननीय श्री. बाळासाहेबजी कोथलकर यांनी बालाजी विद्यालयाची स्थापना शैक्षणिक वर्ष २००३ मध्ये वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना या ठिकाणी केली. त्यांनी २००३ मध्ये लावलेल्या या रोपटयाचे आज वटवृक्षामध्ये रुपांतर झाले असुन आज येथे इयत्ता नर्सरी ते १२ वी पर्यंत मराठी, सेमी इंग्रजी, इंग्रजी, ऊर्दू माध्यमाचे शिक्षण अतिशय अल्प दरामध्ये सीबीएसई व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांप्रमाणे दिले जाते. याचाच परिपाक म्हणुन दरवर्षी विद्यालयाचे विद्यार्थी ५ वी स्कॉलरशिप परिक्षा, ८ वी स्कॉलरशिप परिक्षा, ५ वी नवोदय परिक्षा अशा विविध शासनामार्फत घेतल्या जाणा-या परिक्षामध्ये आपले नावलौकिक करित आहेत. त्यासोबतच इयत्ता १० वी व १२ वी चा सुध्दा उत्कृष्ट निकालाची यशस्वी परंपरा विद्यालयाने आजतागयात कायम राखली आहे. परंतु फक्त शाळेचा चांगला निकाल लागला किंवा विद्यार्थी चांगले गुण संपादन करुन उत्तीर्ण झाले म्हणजेच त्यांचा सर्वागिण विकास झाला असे म्हणता येणार नाही. ही बाब मा. श्री. बाळासाहेबजी कोथलकर यांनी हेरली व शालेय जिवना नंतर आपल्या विद्यालयाचा विद्यार्थी एक चांगला भारतीय नागरिक बनावा म्हणुन प्रत्यक्ष व्यावहारिक जिवन जगत असताना ज्या गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात त्या शिकता याव्यात व त्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा आपल्या भावी आयुष्यात व्हावा यासाठी विविध अश्या सह शालेय उपक्रमांच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासाकडे लक्ष देवून त्याचा सर्वागिण विकास व्हावा म्हणुन संस्थेने खालील प्रमाणे काही विशेष सह शालेय उपक्रम शाळेमध्ये सुरु केले आहेत.
अतिशय माफक दरात आयसीएससी व
सीबीएसई बोर्डाच्या
नामाकिंत शाळाप्रमाणे
उच्च प्रतिचे गुणवत्ता पूर्ण शिक्षण व त्यासोबतच विद्यार्थी
सर्वागिण विकास साधण्यासाठी उपरोक्त विविध उपक्रम सुरु ठेवून त्यामध्ये गरजेप्रमाणे बदल करुन विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासावर भर देण्यात येईल.
श्री. बाळासाहेबजी कचरु कोथलकर (संस्था अध्यक्ष )
शालेय सार्वत्रिक निवडणुक
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन करुन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी व्यवसायभिमुक शिक्षण देण्यात येणार आहे.
श्री. डॉ. अनिलकुमार लाठे (संस्था उपाध्यक्ष)
संस्थाध्यक्ष श्री बाळासाहेब कोथलकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शिक्षक गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी परिश्रम घेत आहेत. हेच आमच्या संस्थेच्या यशाचे गमक होय.
श्री. संजय कोथलकर (संस्था सचिव)
शाळेमध्ये राबविले जाणारे
विशेष सहशालेय उपक्रम
१२ वी च्या मुलींकरीता स्कुटी प्रशिक्षण उपक्रम
i) ग्रामीण भागातील युवती शहरामध्ये गेल्यानंतर आत्मविश्वासाने स्कुटी चालवु
शकतात.
ii) संस्थेने दिलेल्या प्रशिक्षणामुळे युवतीमध्ये एक वेगळा आत्मविश्वास वाढीस लागुन शहरी युवतीसोबत ग्रामीण भागातील मुलीसुध्दा आत्मविश्वासाने स्पर्धा करु
शकतात.
११, १२ वी च्या मुलींकरीता पाककला प्रशिक्षण उपक्रम
(i) ग्रामीण भागातील मुलींना ग्रामीण भागात स्वतःच्या घरी कधीही न बनवले जाणारे पदार्थ उदा. बालुशाई, खमंग ढोकला, कचोरी, समोरा, इमरती इत्यादी पदार्थ बनवता यावेत म्हणून उपक्रमाचे आयोजन. (ii) शालेय शिक्षण संपल्यावर उत्कृष्ट स्वंयपाक करता आल्यास स्वतःची सुगरण म्हणुन एक वेगळी ओळख निर्माण होतेच सोबतच खानावळ किंवा हॉटेल व्यवसाय सुरु करुन विद्यार्थीनी स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात.
वर्षातून किमान एकदा विशेष मार्गदर्शन शिबीराचे आयोजन
i) या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या लोकांनी विविध क्षेत्रात शुन्यातुन आपले विश्व निर्माण केले अशा मान्यवरांचे विशेष मार्गदर्शन व त्यांच्यासोबत संवाद साधता येतो.
ii) यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळुन त्यांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होते.
विद्यार्थ्यासाठी मिनी बचत बँक उपक्रम
i) या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहाराचे प्रत्यक्ष ज्ञान मिळते.
ii) विद्यार्थ्यांना बचतीची आवड व सवय लागते.
मुलींसाठी शिवणकला प्रशिक्षण
i) या उपक्रमामुळे मुली शिवणकला शिकुन आर्थिकदृष्टया सबळ बनुन स्वतःचा टेलरिंग व्यवसाय सुरु करु शकतात.
ii) स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी संस्थेच्या अखत्यारीत असलेल्या श्री महालक्ष्मी पतसंस्थेमार्फत अतिशय अल्पदरात
iii) कर्ज सुविधा उपलब्ध यामुळे ब-याच विद्यार्थीनीना स्वतःचा व्यवसाय थाटण्यास मदत.
सप्त भाषा ज्ञान
i) विशेष सप्त भाषा ज्ञान देण्याचे भविष्यातील नियोजन
ii) मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन शालेय अभ्यासक्रमातील भाषाव्यतीरिक्त संस्कृत, अरेबिक, ऊर्दू व तामिळी या भाषेचे लेखन व वाचन कौशल्य विकसित केल्याने भविष्यात खाजगी क्षेजात विद्यार्थ्यांना नोकरीच्या विशेष संधी उपलब्ध होऊ शकतात. शालेय मंत्रिमंडळ
i) विद्यार्थी दशेतच भारतासारख्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील भावी नागरिकांना लोकशाहीचे बाळकडू पाजले जावे यामुळे प्रतिनिधीक मंत्रिमंडळाची
स्थापना.
ii) यातुन विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण वाढीस लागतो व शासकीय, प्रशासकीय कामकाज प्रत्यक्षात कसे चालते याचे ज्ञान मिळते.
बदाम वाटप
i) विद्यार्थ्याच्या बौध्दिक क्षमतेत वाढ होण्यास मदत होते.
ii) विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढुन आत्मविश्वास वाढतो.
वाढदिवस साजरा करणे
(i) ग्रामीण भाग असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाढदिवस त्याच्या घरी त्याचे आई-वडिल साजरा करतातच असे नाही म्हणुन संस्थेच्या वतीने ज्या त्या वर्गात विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा केल्या जातो. ii) या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह व आत्मविश्वास वाढतो व त्यांना शाळेविषयी गोडी निर्माण होते. झेंडा उपक्रम
1) विद्यार्थ्यांचे शालेय उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक उपक्रम
(ii) आपल्या वर्गासमोर जास्त वेळा झेंडा लागल्यास शिक्षक सुध्दा जागरुक होऊन उपस्थिती वाढविण्यासाठी कटाक्षाने लक्ष देतात.
बालाजी कॅल्क्युलेटर्स
(i) अबॅकस क्लासचे शाळेतच अतिशय माफक दरात शिक्षण दिल्या जाते. यामुळे विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमता जलद गतीने विकसीत होण्यास चालना मिळते.
(ii) गणितीय आकडेमोड जलदगतीने येऊ लागल्यामुळे गणितासारख्या किचकट विषयात सुध्दा विद्यार्थ्यांना गोडी निर्माण होऊ लागते.
दप्तराचे ओझे कमी
करण्यासाठी विशेष उपक्रम
i) या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा भार हलका झाला.
ii) विद्यार्थ्यांना दप्तर ठेवण्यासाठी खास वर्गातच पेटयाची सोय, यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात शिक्षक मर्यादित होमवर्क देतात त्यामुळे फक्त त्याच होमवर्कच्या वहया व तिच पुस्तके घरी नेण्यास मुभा.
उपरोक्त या विशेष उक्रमांसह आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला नकारत्मतेपासून विद्यार्थ्यांनी दुर रहावे व सकारात्मक विचारसरणीचा स्विकार करावा यासाठी शिक्षणाला आध्यात्माची जोड देण्याची कार्य संस्थेच्या माध्यमातुन करण्यात येते याकरिता दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त गावातुन शाळेची पालखी काढल्या जाते. तसेच दरवर्षी बालाजी महाराज प्रगट दिन कार्यक्रम शाळेत साजरा केला जातो व संस्थेच्या वतीने दरवर्षी गावातील भाविक भक्तांसाठी श्रध्दास्थान वालसावंगी ते प्रगटस्थान शेंगाव अशा पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केल्या जाते व मुस्लिम बांधवासाठी पवित्र रमजान महिण्यामध्ये इप्तार पार्टीचे आयोजन संस्थाध्यक्ष श्री. बाळासाहेबजी कोथलकर हे दरवर्षी करतात.






















