खा सुनील तटकरे व सुरजदादा चव्हाण यांच्या स्वागताचा भव्य तयारी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा श्री सुनील तटकरे साहेब तसेच युवक प्रदेशाध्यक्ष मा श्री सूरजदादा चव्हाण साहेब यांच्या २०/०७/२०२५ च्या नियोजित गाव दौर्‍याच्या पार्श्वभुमीवर शासकीय विश्रामगृह उदगीर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस लातूर ची आढावा व नियोजन बैठक युवक प्रदेश उपाध्यक्ष मा इम्तियाझ शेख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्याध्यक्ष मा.प्रा.अंकुश नाडे सर,युवक जिल्हाध्यक्ष मा.महेश बिरादार,उदगीर शहर अध्यक्ष मा सय्यद जानिमिया,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मा शफीजी हाश्मी,सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष मा अभिजीत औटे,युवक जिल्हा कार्याध्यक्ष मा रवी धुमाळ व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.तसेच यावेळी विविध विषयावर सखोल चर्चा व मार्गदर्शन होऊन २० तारखेच्या कार्यक्रमास जिल्हाभरातून सर्वात जास्त संख्येने युवक सहभागी होतील असा ठराव व निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.सुत्रसंचालन विजय होनराव यांनी केले तर बैठकीचे इतिवृत्त शिवप्रसाद लांडगे यांनी अगदी सूक्ष्म व योग्य पद्धतीने केले आणि आभार प्रमोद काळोजी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *