पुणे। ऑल इंडिया जैन कटारिया फाउंडेशनच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ. आशाजी कटारिया यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली पुणे व पीसीएमसी महिला शाखेच्या संयुक्त विद्यमाने पाचणे (पुणे) येथील श्री नाकोडा जैन मंदिर प्रांगणात ‘तीर्थंकर वाटिका’ वृक्षारोपण उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान पार्श्वनाथजी आणि श्री नाकोडाजीच्या मंगल आरतीने करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय महामंत्री (महिला शाखा) प्रा. सौ. सुरेखाजी कटारिया यांनी ‘तीर्थंकर वाटिका’ संकल्पनेची सविस्तर प्रस्तावना मांडली आणि वृक्षारोपण व पर्यावरण रक्षणातील त्याचे महत्त्व पटवून दिले.
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सौ. प्रविताजी कटारिया यांनी सर्व मान्यवर अतिथींचे मन:पूर्वक स्वागत केले. विशेषतः या कार्यक्रमासाठी मुंबईहून आलेले फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ललितजी संघवी यांनी या उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक केले. तसेच कटारिया फाउंडेशनच्या भावी सामाजिक प्रकल्पांसाठी कल्पना आमंत्रित करत योग्य योजनांना आर्थिक पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी जैन धर्मातील २४ तीर्थंकरांनी तपासाठी निवडलेले पवित्र वृक्ष फाउंडेशनच्या सदस्यांनी श्रद्धापूर्वक रोपले.
पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत सौ. वर्षाजी कुदाल यांनी या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे कौतुक करत पर्यावरण जनजागृतीबाबत आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कीर्तनकार डॉ. सौ. श्वेताजी राठोड कटारिया यांनी केले, तर धन्यवादप्रदर्शन सौ. लीनाजी कटारिया यांनी केले.
‘तीर्थंकर वाटिका’ची देखरेख करण्याची जबाबदारी श्री. प्रदीपजी कटारिया यांनी स्वेच्छेने घेतली.
या कार्यक्रमाला पुणे अध्यक्ष श्री. निलेशजी कटारिया, प्रा. श्री. प्रकाशजी कटारिया, श्री. जमनदासजी कटारिया, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. नितेशजी कटारिया, सौ. पुष्पाजी कटारिया, श्री. प्रमोदजी कटारिया, अ?ॅड. सौ. अनिताजी कटारिया, सौ. राखीजी कटारिया, सौ. अल्पनाजी कटारिया, सौ. संगीताजी कटारिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम पर्यावरण रक्षण आणि जैन धर्मातील मूलभूत तत्वांचा सुंदर संगम ठरला.
अ. भा. जैन कटारीया फॉउंडेशन तर्फे तीर्थणकर वाटिका वृक्षरोपण चा नावीन्य पूर्ण कार्य :आशाताई कटारिया

























