श्रमणसंघाचे शिल्पकार, मालव केशरी पूज्य गुरुदेव श्री सौभाग्यमलजी म.सा. यांच्या ४१व्या पुण्यस्मरणदिनी, महावीर भवन, संभाजीनगर येथे १२ जुलै ते १९ जुलै दरम्यान अष्टदिवसीय गुरुभक्ती आनंदोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम उपप्रवर्तनी, ओजस्वी वत्तäया पूज्य श्री सुमनप्रभाजी म.सा. आदी ठाणा-७ यांच्या पावन सान्निध्यात पार पडणार आहे. गुरुभक्तीचा, साधनेचा आणि आत्मशुद्धीचा हा पवित्र सोहळा, गुरुदेवांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्याप्रती श्रद्धांजली वाहण्याची अपूर्व संधी ठरणार आहे.
दररोज सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत विशेष प्रवचन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे:
१२ जुलै – मौन दिवस
१३ जुलै – दान दिवस
१४ जुलै – वंदना दिवस
१५ जुलै – सामूहिक एकासना तप दिवस
(पूज्य श्री स्वर्णश्रीजी म.सा. यांच्या जन्मदिनी ‘हर घर हो एकासन तप’चा संकल्प)
१६ जुलै – सिद्धितप आरंभ दिवस
१७ जुलै – द्रव्य मर्यादा दिवस
१८ जुलै – सामायिक दिवस
१९ जुलै – सामूहिक आयंबिल दिवस
(गुरुदेवांच्या पुण्यस्मरणानिमित्त ‘हर घर दो आयंबिल’चा संकल्प)
या अष्टदिवसीय साधना महोत्सवाचे यशस्वी आयोजन श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, युवक मंडळ, महिला मंडळ, बहू मंडळ आणि युवती मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून होत आहे.
संभाजीनगरातील जैन समाजासाठी हे आठ दिवस गुरुभक्ती, आध्यात्मिक चिंतन व आत्मकल्याणाची अनुपम संधी ठरणार आहे.






















