कळंब:( तोफिक मोमीन ) कळंब: तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने विकास कामाचे उद्घाटन गावातील अनुसूचित जाती नवबौद्ध वस्तीमध्ये सिमेंट रस्त्याचे साईटचे नाली बांधकाम इत्यादी तसेच शेळके दादा यांच्या घरामागील नाली बांधकामाच्या कामाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.
या उद्घाटनप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सौ. लक्ष्मी ताई म्हेत्रे प्रमुख उपस्थित होत्या. कार्यक्रमास तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव माकोडे सर, माजी सरपंच श्री. पद्माकर पाटील, माजी उपसरपंच श्री. मंजूर डांगे, शेळके दादा,भैरवनाथ माकोडे, विनायक चंदन, हर्षल पाटील, समोदियन काझी, दीपक सहाणे (ग्रामपंचायत सदस्य), अहमद, बागवान, मिनाज मतीन बागवान, रफिक शेरा बागवान, बागवान,नर्गिस सलमान शेख बडे,सलीम शेख, खय्युम खुरेशी, अजिम शेज, ताजखाँ पठाण, अमर शेख,जमिर आतार,वसिम पठाण, रमेश पवार, बिभीषण पवार, राम पवार, शाम पवार, शिवाजीराव पवार, अनिल गायसमुद्रे, रवी टोपे, सलीम शेख, कृष्णा खडबडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास वॉर्ड क्रमांक ५ व ६ मधील नागरिक व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामामुळे परिसरातील पायाभूत सुविधा सुधारणार असून या भागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले
इंद्रीरा नगर झोपडपट्टी वस्तीतील सिमेंट रस्त्याचे व नाली बांधकाम कामांचे लोकार्पण


























