स्मार्ट मीटर विरोधात महाविकास आघाडीतर्फे महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा… लासलगाव:सध्या महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बदलण्याचं काम महावितरण कडून सुरू आहे मात्र सामान्य नागरिकांचा याला मोठ्या प्रमाणात विरोध आहे ज्यांचे यापूर्वी मीटर बदलले त्यांना वाढीव स्वरूपाचे बिल येत असल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. या विरोधात महाविकास आघाडीतर्फे लासलगाव येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा नेवून सहाय्यक अभियंता यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सचिन होळकर, शिवा सुराशे, बाळासाहेब जगताप, सुरेश कुमावत, संतोष पानगव्हाणे, प्रमोद पाटील, संतोष वाघ, अमित बकरे, अमित गंभीरे, आशुतोष सूर्यवंशी, राहुल वाघ, सोहम रायते, महेश शिरसाट, सतीश पवार, बाळासाहेब महाराज शिरसाट,बालेश जाधव, सिद्धू होळकर, धनंजय होळकर, अनिल भागवत, संतोष पवार, निलेश वडनेरे, विजय कुंदे तसेच या स्मार्ट मीटर बाबतच्या आणि महावितरणच्या तक्रारी असणारे असंख्य ग्राहक आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मनसे या पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. महावितरणच्या बिलांबद्दल आणि स्मार्ट मीटरच्या विरोधातील अनेक तक्रारी तक्रारदारांनी याप्रसंगी मांडल्या. सदर निवेदनाद्वारे योग्य तो बदल करण्याचे आश्वासन महावितरणचे सहाय्यक अभियंता अजय सावळे यांनी आंदोलन कर्त्यांना दिले.






















