पत्त्याचा खेळ खेळूया आपले कर्ज फेडूया; येवल्यात छावा तर्फे नावीन्यपूर्ण आंदोलन

लातूर येथील राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या दडपशाहीने, निवेदन देणार्‍या शेतकर्‍यांवर अमानुष बेदम मारहाण केली याचा निषेध म्हणून व सरकारच्या शेतकर्‍यांविषयी असलेला नाकर्तेपणा व वारंवार शेतकर्यांबद्दल अपशब्दांचा उल्लेख,यांचा निषेध नोंदविण्यासाठी शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की बुधवार दिनांक २३जुलै रोजी येवला येथील तहसील कार्यालय येथे शेतकर्‍यांनी ‘पत्त्याचा खेळ खेळूया, आपले कर्ज फेडूया !’ या महाराष्ट्र सरकारच्या संकल्पनेला प्रतीसाद देण्यासाठी शेतकर्‍यांनी आपापले पत्त्याचे पाने घेऊन ठीक ११वा.
पत्ते खेळून सरकारचा निषेध नोंदवायचा आहे,तरी तमाम शेतकरी बांधवांनी एक वेळ शेतकर्‍यांसाठी ताकतीने तहसील येथील प्रांगणात पत्ते खेळण्यासाठी यायचं आहे. प्रमुख उपस्थिती – छावा क्रांतीवीर सोन नाशिक जिल्हा व सर्व शेतकरी नेते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *