पाटोदा (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत वटवृक्षाच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात नगरसेवक आसिफशेठ सौदागर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या अनोख्या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वटवृक्षाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पर्यावरणाविषयी जागृती, वृक्षांचे महत्त्व आणि निसर्गाशी नाळ जोडण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.कार्यक्रमात बोलताना नगरसेवक आसिफशेठ सौदागर म्हणाले, ‘शालेय स्तरावर अशा उपक्रमांची गरज आहे. लहान वयात मुलांमध्ये पर्यावरणप्रेम रुजवणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने वर्षातून एक झाड लावण्याचा आणि त्याची जबाबदारी घेण्याचा संकल्प केला पाहिजे.’या वेळी शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांच्या पर्यावरण गीत आणि घोषणांनी करण्यात आली
वटवृक्षाच्या वाढदिवसा निमित्त नगरसेवक आसिफशेठ सौदागर यांच्या हस्ते केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण






















