पाटोदा (प्रतिनिधी) प्रत्येक गाव, प्रत्येक प्रभागात एखादा माणूस असा असतो, जो केवळ नेता नसतो, तर तेथील जनतेसाठी कुटुंबातील एक सदस्य बनून राहतो. अशाच एका व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे श्रीहरी गीते बापू पाटील, प्रभाग क्रमांक १७ मधील प्रत्येकाच्या मनातील श्रद्धास्थान.बापूंची खासियत म्हणजे ते माणसात देव पाहतात आणि स्वतः माणसात देवत्व जगतात. आजच्या राजकारणाने गढलेल्या वातावरणात जिथे जात, धर्म, पक्ष, ओळख यांचं वजन वाढलेलं आहे, तिथे श्रीहरी बापू यांचं माणुसकीवर आधारित कार्य हे एक अद्वितीय उदाहरण बनून उभं आहे.त्यांना कोणत्याही वेळची अडचण नाही. कोणाचं दुःख असो, कोणतीही समस्या असो बापू नेहमी तत्पर असतात. “सेवा हाच धर्म” ही त्यांची जीवनशैली आहे. कोणताही सामाजिक कार्यक्रम असो, अपघात असो, आरोग्य विषयक अडचण असो, शासकीय काम काजातील अडथळा असो प्रत्येक ठिकाणी ‘बापू’ हा एक आधारवड बनून उभा असतो.बापूंसाठी पद, पक्ष किंवा प्रतिष्ठा महत्त्वाची नाही, त्यांच्या दृष्टीने लोकांची सुखदुःख हीच खरी सत्ता आहे. त्यांनी राजकारण कधीही व्यक्तिमत्त्वावर हावी होऊ दिलं नाही, कारण त्यांचं राजकारण म्हणजे माणूसपण आणि माणुसकीची सेवा.आज प्रभाग १७ मध्ये जर एखाद्याला विचारलं, “तुमचं कोण आहे?” तर उत्तर सरळ येईल “बापू आहेत!”कारण श्रीहरी गीते बापू हे नुसते लोकप्रतिनिधी नाहीत, ते जनतेच्या हक्काचा आवाज, संकटातला खंबीर खांदा आणि वचनपूर्तीचं प्रतीक बनले आहेत.त्यांच्या कार्यामुळेच आज प्रभाग क्रमांक सतरा हा सामाजिक, नागरी आणि विकासाच्या मार्गावर पुढे जातो आहे.”राजकारण नाही, तर सेवाकार्य हीच खरी ओळख!” – हाच बापूंचा संदेश आहे आणि हेच त्यांचे अस्तित्व.त्यांच्या सारख्या नेत्यांची समाजाला आज नितांत गरज आहे! श्रीहरी गीते बापू पाटील – एक नेता नव्हे, एक माणूसपण जपणारा सेवाव्रती योध्दा!
श्रीहरी गीते बापू पाटील एक नेता नव्हे, एक माणूसपण जपणारा सेवाव्रती योध्दा






















