दोन हजार सीए विद्यार्थ्यांसाठी भव्य वसतिगृह उभारणीसाठी मोतीलाल ओसवाल फाउंडेशनकडून १०० कोटींची ऐतिहासिक देणगी

मुंबई – देशातील प्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ आणि मोतीलाल ओसवाल ग्रुपचे संस्थापक श्री मोतीलाल ओसवाल यांनी मुंबईत सीए विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक वसतिगृह उभारण्यासाठी ?१०० कोटींची भव्य देणगी दिली आहे.
ही रक्कम Rन्न्उ एज्युकेशनल फाउंडेशनला दिली गेली असून, अंधेरी पूर्वेतील मारोल येथे ‘अग्रवाल-ओसवाल छात्रावास’ या नावाने दोन १७-मजली इमारतींचे वसतिगृह उभारले जाणार आहे. या प्रकल्पाचा एकूण बांधकाम क्षेत्र ४ लाख चौरस फूटांहून अधिक असेल.
या वसतिगृहात २००० हून अधिक सीए विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था असेल. यामध्ये अभ्यासासाठी डिजिटल लायब्ररी, मेस, वेलनेस आणि फिटनेस झोन, वाचन-कक्ष अशा अत्याधुनिक सुविधा असणार आहेत.
‘स्मृतीतून सेवा’ – एक आदर्श उपक्रम
श्री मोतीलाल ओसवाल आणि श्री रामदेव अग्रवाल हे दोघेही त्यांच्या करिअरच्या सुरुवातीस Rन्न्उ वसतिगृहात राहत होते. त्या दिवसांची आठवण म्हणून त्यांनी ‘गिव्ह बॅक’ करण्याच्या भावनेने ही देणगी दिली आहे.
‘Rन्न्उ वसतिगृहाने आमच्या आयुष्याला दिशा दिली. आज आम्ही जिथे आहोत, ते त्या सुरुवातीच्या आधारामुळे शक्य झाले. हेच संधी नवीन पिढीला द्यावी, हे आमचे कर्तव्य आहे.’ — मोतीलाल ओसवाल
याआधीही मोतीलाल ओसवाल फाउंडेशनने हैदराबाद येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (घ्एँ) ला १०० कोटींची देणगी देऊन ‘‘Motilal Oswal Executive Centre’ ’ उभारण्यासाठी हातभार लावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *