चांदवडला राष्ट्रीय लोकन्यायालयात १५८५ प्रकरणे निकाली; एक कोटी ७१ लाख २३ हजार रुपयांची वसुली

 

चांदवड (कीर्ती गुजराथी) –
चांदवड तालुका विधी सेवा समिती व चांदवड तालुका वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १३) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात न्यायचौकशीपूर्व व न्यायालयीन प्रलंबीत अशी एकूण १५८५ प्रकरणे निकाली काढण्यात आली तर एकूण एक कोटी ७१ लाख २३ हजार ३१२ रुपये इतकी वसुली करण्यात आली.
राष्ट्रीय लोकन्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरुपाची एकूण १८३० प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३६ प्रकरणांमध्ये तडजोड झाल्याने ती निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयात दंडरुपाने व बँक वसुली एक कोटी १३ लाख ७९ हजार १५६ रुपये इतकी रक्कम वसुल करण्यात आली. तसेच ३५३९ प्रीलिटीगेशन प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील १५४९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ग्रामपंचायतीच्या १५१५, बँका आणि वीजबीले प्रकरणे यांच्या ३४ तडजोडीच्या निकाली प्रकरणांमध्ये एकुण ५७ लाख ४४ हजार १५६ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली. न्यायचौकशीपूर्व आणि न्यायालयीन प्रलंबीत प्रकरणांमध्ये एकूण एक कोटी ७१ लाख २३ हजार ३१२ रुपये इतकी वसुली होऊन १५८५ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
राष्ट्रीय लोकन्यायालयात तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एस. एस. छल्लाणी यांच्या अध्यक्षतेखाली पॅनल प्रमुख म्हणून सहदिवाणी न्यायाधिश व्ही. डी. सुंगारे यांनी काम पाहिले. तर पॅनल मेंबर म्हणून अ‍ॅड. प्रमोद पाटील या विधीज्ञांनी काम पाहिले. या लोकन्यायालयासाठी तालुका वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. दिनकर ठाकरे, उपाध्यक्ष अ‍ॅड. भैय्यासाहेब पटेल, चांदवड वकिल संघाचे सदस्य, तालुका विधी सेवा समितीचे सहायक अधिक्षक एम. डी. मंडाले, व्ही. सी. राव आदींसह पॅनलवरील नेमण्यात आलेले न्यायालयीन कर्मचारी, चांदवड व वडनेरभैरव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते.
——
फोटो- चांदवड येथील लोकन्यायालयात न्यायालयीन प्रलंबीत प्रकरणे निकाली काढताना दिवाणी न्यायाधिश एस. एस. छल्लाणी, सहदिवाणी न्यायाधिश व्ही. डी. सुंगारे. समवेत अ‍ॅड. प्रमोद पाटील, विधीज्ञ, अधिकारी, कर्मचारी व पक्षकार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *