लासलगाव येते बैलपोळ्यासाठी दुकानं सजली; सर्जा-राजाच्या सणासाठी शेतकरी सज्ज

साहित्य खरेदीत दहा ते पंधरा टक्के वाढ”

लासलगाव :(आसिफ पठाण)
शेतकरी राजा समवेत कायम शेतात राबराब राबणाऱ्या लाडक्या सर्जा-राजाचा अर्थात बैलांचा सण म्हणजे बैलपोळा हा सण शुक्रवारी असल्याने
बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांनी लासलगाव बाजारपेठ सजली आहे. बाजारातील विविध आकर्षक वाटणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारत गर्दी होत आहे.

यंदा पावसाचे समाधानकारक आगमन झाल्याने शेतकऱ्यांचा उत्साह अधिक वाढला आहे. जरी शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसला तरी आपल्या उपकारकर्त्या सर्जा -राजासाठी शेतकरी बांधव साहित्य खरेदी करताना मागे हटत नाहीत. शिंग गोंडे, माथुटी, कासरा, मोहरकी, नाथ आदी साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळते.

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी दहा ते पंधरा टक्के खरेदीत वाढ झाल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

कोट……

लासलगाव येथील “शेतकरी बांधव पोळ्याला नेहमीच मोठ्या उत्साहाने साहित्य खरेदी करतात. यंदा पावसाचे समाधानकारक आगमन झाल्याने बाजारपेठेत आणखी चैतन्य दिसत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत खरेदीत दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे.”

(व्यापारी अनिल ठोके, ओम ट्रेडर्स, लासलगाव)

कोट…..

“सर्जा- राजा हा आमचा खरा सोबती आहे. वर्षभर शेतात त्याच्यावरच भरोसा असतो. त्याच्या आरोग्यासाठी व सन्मानासाठी पोळ्याला साहित्य खरेदी करणं ही आमच्यासाठी परंपरा नाही तर भावनिक जबाबदारी आहे. शेतमालाला भाव मिळो न मिळो, पण सर्जा- राजासाठी आम्ही कधीच मागे हटत नाही.”

(पप्पु खांगळ ,कोलटेक, शेतकरी.)

पोळा सणाचे महत्त्व :
हा सण म्हणजे शेतकरी आणि जनावरांतील कृतज्ञतेचे प्रतीक आहे. बैलांना उटणी, सजावट करून त्यांना पोळी-पुरणाचा नैवेद्य दाखवून शेतकरी आपला आभारीपणा व्यक्त करतात. “सर्जा राजाच्या आरोग्यानेच शेतकऱ्याचे जीवन बहरते” असा भाव या सणातून अधोरेखित होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *