पारध शाहूराजे (तालुका भोकरदन जिल्हा जालना) – मराठ्यांच्या इतिहासातील एक गौरवशाली अध्याय जपण्यासाठी भोकरदन तालुक्यातील पारध येथे थोरले छत्रपती शाहू महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा निर्णय अत्यंत अभिमानास्पद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र असलेल्या शाहू महाराजांनी याच भूमीवर पहिली लढाई जिंकली आणि येथे वास्तव्य केले होते. त्यांच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून हे स्मारक भावी पिढीला प्रेरणा देईल.
या स्मारकासाठी १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, ५ एकर जागेवर हे स्मारक उभारले जाईल. यासाठी पराशर मुनी मंदिर परिसर आणि शाहू महाराजांच्या काळातील तपासणी नाका अशा दोन जागांचा विचार केला जात आहे. हे स्मारक केवळ पारध गावाचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे वैभव वाढवेल, यात शंका नाही.
या स्मारकाच्या उभारणीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार संतोष पाटील दानवे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे, स्वयम् सामाजिक संस्था, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जन्ममेयजय राजे भोसले यांचे मनःपूर्वक आभार. हा निर्णय मराठ्यांचा देदीप्यमान इतिहास जतन करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.
— श्री महेंद्र बेराड सर,
ग्रामस्थ भोकरदन तालुका प्रतिनिधी AHB टाईम्स तथा संचालक
श्री गजानन कॉम्प्युटर्स,पारध






















