लासलगाव: महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात नूतन विद्या प्रसारक मंडळाचे इंग्लिश मीडियम स्कूल तालुकास्तरावर प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले आहे. या यशाबद्दल शासनामार्फत दिले जाणारे तीन लाख रुपयांचे पारितोषिक नुकतेच शाळेला वितरित करण्यात आले.
शासन विविध योजनांच्या माध्यमातून शाळांमध्ये बदल घडवून त्यांचा दर्जा सुधारत आहे. मुलांना जीवनाशी निगडित बाबी शिकवण्याचा प्रयत्न केला जातोय. या अभियानांतर्गत शाळांमध्ये भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा यांसारखी प्रमुख क्षेत्रे निश्चित करण्यात आली होती. या अभियानातून विद्यार्थीपूरक बदल घडत असून, शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास प्राधान्य दिले जात असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका शितल आचार्य यांनी दिली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन संदीप होळकर, सदस्य हसमुख भाई पटेल, चंद्रशेखर होळकर, सचिन मालपाणी तसेच योगेश पाटील यांनी शाळेचे कौतुक व अभिनंदन केले आहे. या यशस्वीते मागे कॉलेजचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे, ज्युनिअर कॉलेज विभागाचे उज्वल शेलार व महेश होळकर, शाळेच्या उपमुख्याध्यापिका मीनल होळकर, परीक्षा विभाग प्रमुख नीता जेजुरकर, माध्यमिक विभाग प्रमुख तुकाराम केदारे, प्राथमिक विभाग प्रमुख मंजू वाधवा, अभियानाचे शाळेकडून निवेदन करणारे शुभांग घोटेकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले. या गौरवास्पद कामगिरीमुळे पंचक्रोशी व परिसरामध्ये शाळेचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा: लासलगावच्या नूतन इंग्लिश मीडियम स्कूलला ३ लाखांचा पुरस्कार

























