श्री.मतोबा महाराज मुर्ती चोरी प्रकरणाच्या तपासावर भाविक व ग्रामस्थांची तिव्र नाराजी..

 

जलद गतिने तपास होण्याच्या मागनीसाठी नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको

निफाड (विशेष प्रतिनिधी ) नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नैताळे येथील प्रसिध्द देवस्थान श्री मतोबा महाराज मंदिरातुन ३ डिसेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यानी दोन मुर्तीची चोरी केली आहे.या चोरीचा निफाड पोलिसांकडून अद्याप तपास लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर भाविकांनी व ग्रामस्थांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.चोरीचा तपास जलद गतीने व्हावा या मागनीसाठी आज सकाळी १०-१५ वाजता नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर लासलगाव बाजार समितीचे संचालक व माजी सरपंच राजेंद्र बोरगुडे,शिवाजी बोरगुडे, दादा बोरगुडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाविकांनी व ग्रामस्थानी जवळपास एक तासापेक्षा जास्त वेळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .पोलिस उपअधिक्षक कांतीलाल पाटील यांच्या आश्वासनानंतर त्याना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.

नाशिक ग्रामिणचे पोलिस अधिक्षक यांच्या नावाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व नैताळे ग्रामस्थांचे अराद्य दैवत श्री मतोबा महाराज यांच्या मंदीरातुन दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास चांदीच्या तीन किलो वजनाच्या दोन मुर्तीची व दान पेटीची अज्ञात चोरट्यानी चोरी केली असुन या घटनेमुळे ग्रामस्थामध्ये तिव्र संताप व्यक्त होत असुन पोलिस प्रशासन चोरट्याना व मुर्तीना अजुनही शोधू शकले नसल्याने भाविक व ग्रामस्थामध्ये तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. ३ जानेवारी २०२६ रोजी श्री मतोबा महाराज यांचा अखंड १५ दिवस चालणारा यात्रोत्सव सुरु होणार आहे यावेळी महापुजेसाठी व रथ मिरवनुकीसाठी मुर्तीची आवश्यकता आहे मुर्ती चोरी प्रकरणाचा व आरोपीचा अद्याप शोध लागत नसल्याने पोलिसाच्या कार्यप्रणालिवर तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय या देवस्थानला खासदार भास्कर भगरे व आमदार दिलीपराव बनकर यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांना तपासाच्या सुचना केल्या आहेत मात्र अद्याप मुर्ती चोरीमुळे नैताळे येथे जिल्हा पोलिस प्रमुख,जिल्हाधिकारी ,प्रांताधिकारी या आधिकार्यानी या प्रकारणाची दखल घेतली नाही शिवाय देवस्थानला भेटही दिलेली नाही तेव्हा ग्रामस्थांच्या व भाविकांच्या श्रध्देचा विचार करुन या चोरी प्रकारणाचा तातडीने तपास करुन भाविकाना व ग्रामस्थाना दिलासा द्यावा असेही निवेदनात शेवटी म्हटले आहे रास्ता रोको आंदोलन प्रसंगी तहसिलदार कार्यालयाच्या वतीने मंडळ अधिकारी अश्विनी भोसले, तलाठी आईटवार पोलिस कर्मचाऱ्यांसह शेकडो संखेने भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.
————————-
@चौकट-
भाविकांच्या व ग्रामस्थांच्या श्रेदेचा व भावनेचा आम्ही आदर करतो ,मुर्ती चोरी प्रकरणाचा तपास प्रकारणात पोलिसांच्या अनेक टिम काम करत असुन लवकरात लवकर तपास करुन भाविकांना व ग्रामस्थाना दिलासा देऊ..!
-कांतीलाल पाटील.
पोलिसउपआधिक्षक ,निफाड
—————————-
@चौकट-
श्री मतोबा महाराज देवस्थानातील मुर्ती चोरीचा विषय हा लाखो भाविकांच्या व ग्रामस्थाच्या श्रेध्देचा विषय आहे .३ डिसेंबर पासुन मुर्ती चोरीमुळे तिव्र स्वरुपाचा संताप व्यक्त होत आहे.पोलिसानी जलद गतिने तपास करुन दिलासा द्यावा अन्यथा पुन्हा आंदोलन केले जाईल
-केशव नाना बोरगुडे
विश्वस्त- श्री मतोबा महाराज देवस्थान
————————–
@ चौकट-
नाशिक-छत्रपती संभांजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु असताना अचानक अँम्बुलन्स चा आवाज आल्याने सवेंदनशिलता लक्षात घेऊन आंदोलन कर्त्यानी तातडीने रस्ता मोकळा करुन दिला
————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *