निफाड ( कृष्णा गायकवाड) पिंपळगाव बसवंत शहरांमध्ये बौद्ध आणि मातंग समाजाची पहिली ऐक्य परिषद मोठ्या उत्साहात पिंपळगाव बसवंत या ठिकाणी संपन्न झाली आहे या ऐक्य परिषदेमध्ये बौद्ध आणि मातंग समाजाच्या एकजुटीचा ठराव करण्यात आला. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला व सर्व महामानव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून परिषदेला सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक गांगुर्डे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान घोडेस्वार यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संविधान अभ्यासक किरण मोहिते यांनी या परिषदेत मार्गदर्शन करताना कोणतेही महापुरुषाची जयंती साजरी करताना त्यांचा इतिहास जाणून घेणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले मात्र सध्या लोक इतिहास वाचन न करता गाजा वाजा करण्यावर भर देतात यामुळे अशा परिषदा घेऊन खरा इतिहास जनतेसमोर घेऊन जाणे काळाची गरज आहे . साहित्यक शरद गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना इतिहासातील अनेक कालखंडात बौद्ध आणि मातंग एकता दिसून आली यामुळे याची एकता कुणीही मनुवादी तोडू शकत नाही ऐक्य परिषदेच्या शेवटी समाज बांधवांनी एकत्र येऊन एकजुटीचा ठराव केला . लोक लढा सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने पिंपळगाव बसवंत मध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली होती परिषदेमध्ये बोलताना जगा भोवती पण चळवळी बंदिस्त करू नका हे गेल्या अनेक वर्षापासून झाल्यामुळे आपण व्यक्तींचा जयजयकार करत बसलो आणि विचारांना आपण फाटा दिला आहे व्यक्ती महत्त्वाचे नाही विचार महत्त्वाचे आहे व्यक्तींच्या भौतिक चळवळी गुंफून ठेवू नका लीडर होण्याच्या चळवळी बंद करा नंबर एक नंबर दोन जनरेशन मुव्हमेंट असलेल्या मुव्हमेंट चालवा आणि हे जे बसलेले लोक आहेत या लोकांना केंद्रबिंदू करा हे आज ऐक्य परिषद बसलेले असतील आणि निघून जातील मला एकही फोन करणार नाही भाऊ आता पुढे काय करायचे पुढची परिषद कशी करायची मी काय करू शकतो अशा प्रकारचे उपस्थितांना संबोधित करण्यात आले. ही मातंग आणि बौद्ध ऐक्य परिषद यशस्वी करण्यासाठी समाधान घोडेस्वार अशोक गागुर्डॅ, योगेश गांगुर्डे , संतोष सुरवाडकर ,सदाभाऊ सोळशे, भाऊसाहेब सोळशे, पंडित जाधव ,संदीप जाधव ,नाना जाधव, शशिकांत सोनवणे, सुजन गांगुर्डे ,भारत साबळे ,राहुल गांगुर्डे, केशव साळवे ,अंबादास जाधव ,पप्पू गांगुर्डे , दौलत कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पिंपळगाव येथे मातंग आणि बौद्ध समाजाचे ऐक्य परिषद उत्साहात संपन्न


























