माणुसपण जपणारा नवरत्न चिक्की उद्योग समुह गिरिष पारख जपताहेत माणुसकी
सामाजिक भान जपुन व्यवसायात वृद्धि करणारे नवरत्न चिक्की उद्योग समुहाचे गिरीष पारख त्यांनी आपल्या व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले पण तरीही माणुसपणाचा वसा सोडला नाही. लोणावळा शहरात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आपण समाजाचे देणे लागतो हि भावना त्यांच्यात आहे.
म्हणून आपल्या कार्यात त्यांनी वेगळंपण जपलं आहे. घरातले संस्कार आणि त्यांना शालेय शिक्षणात व महाविद्यालयीन शिक्षणात त्यांच्या गुरुजनाने दिलेले आजही त्यांना पुढील कार्य करण्यासाठी प्रेरणा देतात त्यांचे वडील धनराजजी आणि काका झुंबरलालजी दोघे नोकरी करत असताना त्यांची आजी पांनकुवर यांनी आपल्या छोट्या व्यवसायातुन एका नव्या व्यवसायाला मुहूर्तमेढ लावला. १९४९ मध्ये आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. आणि व्यवसाय करण्याची जिद्द व सचोटी यामुळे या व्यवसायाची भरभराट होऊ लागली. वडील धनराजजी आणि काका झुंबरलालजी यांच्या सकारात्मक प्रेरणेमुळे गिरीश पारख यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून भाऊ महेंद्र यांनीही शिक्षणानंतर या व्यवसायात स्वतःला झोकुन दिले नातं माणसाशी झेप आकाशाकडे हेच ध्येय घेऊन व्यवसाय मध्ये वेगळे अस्तीत्व प्राप्त केले.आई वडील यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी माणुसपणाचा वसा जोपासला आहे. आई वडील यांना आयुर्वेद ची माहिती असल्यामुळे नागीण या रोगावरील आयुर्वेदिक औषध आजही नवरत्न चिक्की येथे मिळते.एखाद्या गोष्टीची जर इच्छा असेल तर त्यातून अनेक प्रकारचे मार्ग निघू शकतात त्यामुळे आई-वडिलांचा आशीर्वाद आणि काकांचा आशीर्वाद घेऊन गिरीश पारख यांनी १९८० पासून आपल्या नवरत्न चिक्कीला महाराष्ट्रा ही बाजारपेठ मिळवुन दिली. महाराष्ट्रात नवरत्न चिक्की उद्योगाला एक चालना मिळाली आहे.सामाजिक सांस्कृतिक विधायक रचनात्मक कामात सतत अग्रेसर असणारे गिरीश पारख यांनी आपल्या व्यवसायाला वेगळेपण निर्माण करून दिले आहे लोणावळा येथील ईगल सोशल क्लब द्वारे त्यांनी सामाजिक कामास सुरुवात केली सुरुवात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महेश गुप्ता तसेच देवेंद्र टाटिया या मंडळींच्या बरोबर त्यांनी कमी वयात वेगळेपण जपले आहे सामाजिक बांधिलकी जपत असताना त्यांनी व्यवसायाला प्रगतीपथाकडे नेले आहे.केवळ व्यवसाय म्हणून त्यांनी काम केले नाही तर, सामाजिक जाणीव त्यांनी जपली आहे .त्यामुळेच खंडाळ्यासारख्या व लोणावळा सारख्या भागात कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था तसेच स्थानकवासी जैन श्रावक संघासाठी त्यांचे योगदान आहे. त्यांनी आपल्या व्यवसाय बरोबर जैन मायनॉरिटी फेडरेशन चे प्रदेश महामंत्री, पुणे येथील जितो या संस्थेचे ते संरक्षक मेबंर आहेत. व्ही पी एस हायस्कूल चे विश्वस्त म्हणून कारभार सांभाळतात.चातुर्मास कार्यक्रम प्रमुख म्हणून ते काम पाहतात. आपला विश्वास व प्रेमळ स्वभाव आणि दुसर्यांवर असलेली प्रेमभावना या माध्यमातून त्यांनी प्रत्येकाशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या कडे जे आहे. ते समाजाला द्यावे ही उदात भावना गिरीश पारख यांची आहे. दीनदुबळ्यांना जे शक्य आहे ते दिले तर त्याचे पुण्य मिळते हि देण्याची भावना जपण्याचे काम गिरीश पारख करत आहेत. आपल्या व्यवसायातून त्यांनी सामाजिक गुणात्मक दर्जा निर्माण केला आहे लोणावळा नवरत्न चिक्कीला गिरीश पारख यांनी दैदीप्यमान अशी ओळख निर्माण करून दिली आहे.
त्यामुळे गिरीश पारख यांची. नवरत्न चिक्की उद्योग समुहाची भरारी अधिक असुन सामाजिक आयाम प्राप्त करणारी हि संस्था यशस्वी वाटचाल करत आहे. गिरीश पारख प्रकोट भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. म्हणून त्याच्या कार्याला वेगळा आयाम आहे.
गिरीश पारख समाजाकरता महत्वपूर्ण योगदागिरीश पारख समाजाकरता महत्वपूर्ण योगदान
सचिव बीजेपी जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश
महामंत्री ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन
श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फ्रेन्स
अध्यक्ष अल्पसंख्यांक योजना महाराष्ट्र पंचम झोन
आंतरराष्ट्रीय माजी झोन चेअरमन लायन्स क्लब
लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष लोणावळा
संरक्षक सदस्य जितो
सदस्य MCIAA






















