*_बुधवारी (१९) शंभर सारस्वतांचा सन्मान_*
*नाशिक:-येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील साहित्याचा मळा फुलवत अक्षरपेरणी करणाऱ्या १०० साहित्यिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार आणि कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर यांनी दिली.*
*सावानाच्या मु.शं.औरंगाबादकर सभागृहात बुधवारी (दि.१९) सायंकाळी ५ वाजता गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या २६व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमाचे शतक पूर्ण झाल्याबद्दल नाशिक जिल्ह्यातील १०० साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा संक्षिप्त ऐवज असलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा तसेच या १०० साहित्यिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके भूषविणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.भगीरथ शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ समाजसेवक नामको बँकेचे संचालक प्रकाश दायमा, मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, चांदवडच्या नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रमचे चेअरमन बेबीलाल संचेती, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य हरिष आडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गिरणा गौरव प्रतिष्ठान, टीम पुस्तकावर बोलू काही आणि गिरजा महिला मंचने केले आहे.*
*_गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनी_*


























