दिंडोरी-पेठ तालुक्याच्या विकासाला नवी दिशा”
पिंपळगाव बसवंत
(कृष्णा गायकवाड)
दिंडोरी-पेठ तालुका : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार मा. नरहरी झिरवाळ यांच्या दूरदृष्टीतून व सामाजिक विकासाभिमुख संकल्पनेतून दिंडोरी-पेठ तालुक्यात उदयास आलेले युवा नेतृत्व मा. गोकुळभाऊ झिरवाळ यांची आदिवासी विकास महामंडळ संचालकपदी निवड मोठ्या मतांनी करण्यात आली असून या यशाचे व्यापक स्वरूपात कौतुक होत आहे.
याप्रसंगी आयोजित सत्कार कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष मा. श्री. नामदेव देवराम गावित तसेच भवानी लान्स व नर्सरीचे संचालक मा. श्री. विजय बोराडे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मा. झिरवाळ यांचा मान्यवर उपस्थितीत गौरव केला.
नवनियुक्त संचालक गोकुळभाऊ झिरवाळ यांनी विश्वास व्यक्त करताना सांगितले की, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सक्षमीकरण, पायाभूत सुविधा उभारणी, रोजगाराभिमुख उपक्रम व छोटे-मोठे उद्योग प्रोत्साहन यांसह सर्वसमावेशक विकासाचा आराखडा प्राधान्याने राबविण्यात येईल.
या निवडीमुळे दिंडोरी-पेठ परिसरासह दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सरकारी शासकीय योजनांची जनजागृती व प्रशासनिक तीव्रता वाढून विकासकार्यांना नवी गती मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास विविध सामाजिक संस्था, युवा प्रतिनिधी, स्थानिक कार्यकर्ते, उद्योजक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मान्य उपस्थिति होते. शेवटी उपस्थितांनी झिरवाळ यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


























