भाजपाच्या धाराशिव तालुका चिटणीसपदी सचिन लोमटे यांची निवड

 

धाराशिव : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक मजबुती साठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या मान्यतेनुसार आमदार मा. राणाजगजितसिंह पाटील साहेब, मा. आ.सुजितसिंह ठाकूर साहेब,यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी, यांच्या सूचनेनुसार धाराशिव जिल्ह्यातील पक्षाचे संघटनात्मक काम अधिक जोमाने व बळकट व्हावे यासाठी संघटनात्मक बांधणीच्या पातळीवर धाराशिव तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची तालुका पश्चिम ग्रामीण मंडळाची कार्यकारणी गठीत करण्यात आली.
यामध्ये तुगांव येथील सचिन लोमटे यांची धाराशिव तालुका चिटणीस पदी निवड करण्यात आली. लोमटे हे उच्चशिक्षित असून भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित असून युवकांमध्ये त्यांचा चांगला जणसंपर्क आणि संघटन कौशल्य ही त्यांची ओळख आहे. त्यांच्या या निवडीचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.
“पक्ष नेतृत्वाने दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी सन्मान आहे. भाजप हा केवळ पक्ष नाही, तर राष्ट्रनिर्मितीचा विचार आहे. या विचाराशी अधिकाधिक युवक जोडण्यासाठी काम करून तालुकास्थरावर पक्षाची संघटना मजबूत करून, केंद्र व राज्य शासनाच्या योजना पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून संघटनात्मक बांधणी बळकट करून तळागळातील काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देऊन ही जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन निःपक्षपाती पार पाडू असे मत सचिन लोमटे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *