निफाड ।प्रतिनिधी
कोविड काळापासुन बंद केलेल्या प्रवासी गाडीच्या थांब्याबाबत उगांव शिवडी भागातील नागरिकांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला त्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येऊन तसे निर्देशही दिले होते अखेरीस रेल्वे प्रशासनाने उगांव रेल्वे स्टेशनवर प्रवासी रेल्वेगाड्यांना उद्या शुक्रवार दि १४ नोव्हेंबरपासुन
प्रायोगिक तत्वावर थांबा दिला आहे
मध्य रेल्वेच्या उगांव रेल्वे स्टेशन वर भुसावळ – इगतपुरी एक्सप्रेस व भुसावळ – देवळाली एक्सप्रेस या गाड्यांना अतिरिक्त थांबा दिला आहे त्यानुसारभुसावळ – इगतपुरी एक्सप्रेस गाडी क्रमांक 11119 इगतपुरी – भुसावळ एक्सप्रेस ही गाडी दिनांक 14.11.2025 पासून उगांव स्टेशनवर आगमन 11.52 वाजता व प्रस्थान 11.53 वाजता असा अतिरिक्त थांबा घेईल. गाडी क्रमांक 11120 भुसावळ – इगतपुरी एक्सप्रेस ही गाडी दिनांक उगांव स्टेशनवर आगमन 12.17 वाजता व प्रस्थान 12.18 वाजता असा अतिरिक्त थांबा घेईल.भुसावळ – देवळाली एक्सप्रेस गाडी क्रमांक 11113 देवळाली – भुसावळ एक्सप्रेस ही गाडी दिनांक उगांव स्टेशनवर आगमन 08.01 वाजता व प्रस्थान 08.02 वाजता असा अतिरिक्त थांबा घेईल. गाडी क्रमांक 11114 भुसावळ – देवळाली एक्सप्रेस ही गाडी उगांव स्टेशनवर आगमन 21.04 वाजता व प्रस्थान 21.05 वाजता असा अतिरिक्त थांबा घेईल.असे रेल्वे प्रशासनाचे वतीने जाहिर करण्यात आले आहे
या रेल्वेगाड्यांना थांब्याबाबत उगांव शिवडी खेडे थेटाळे वनसगांव पानेवाडी भागातील नागरिकांचे वतीने द्राक्ष बागाईतदार संघाचे संचालक अँड रामनाथ शिंदे शिवडीच्या सरपंच संगिता सांगळे उगांवचे माजी उपसरपंच प्रभाकर मापारी , दत्तात्रेय सुडके , छोटुकाका पानगव्हाणे मनसेचे तालुका सरचिटणीस अब्दुल शेख ,शिवा ढोमसे ,नौशाद सैय्यद ,शिवडीचे माजी उपसरपंच संजय शिंदे ,दत्ता ढोमसे ,अरुण क्षीरसागर , पांडुरंग कडवे , रामनाथ सांगळे आदीसंह नागरिकांनी पाठपुरावा केला होता
दरम्यान परिसरातील नागरिकांचे वतीने उद्या शुक्रवार दि १४ रोजी सकाळी उगांव रेल्वे स्टेशन वर मेमु गाडीचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार असल्याचे सरपंच संगिता सांगळे यांनी सांगितले आहे

























