लासलगाव:
लासलगाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून थंडीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, बोचऱ्या थंडीमुळे नागरिकांनी उब मिळवण्यासाठी शेकोट्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली आहे. थंडीच्या वाढलेल्या कडाक्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी नागरिक स्वेटर, शाली आणि कानटोपीचा वापर करताना दिसत आहेत.
बाजारात, चौकाचौकात आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचे छोटे गट एकत्र येऊन शेकोट्या पेटवून उब घेतानाचे चित्र दिसत आहे. थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी नागरिक आणि व्यावसायिक शेकोटी पेटवत आहेत.
लासलगावमध्ये थंडीचा कडाका वाढला; नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना


























