भुसावळ येथे येत्या 15 नोव्हेंबर 2025 रोजी मुलींसाठी अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स सायकलिंग लीग जिल्हास्तर चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सायकलपटू मुली,महिलांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://account.kheloindia.gov.in/#/athlete-signup या लिंकवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून KID No. येतो तो घेणे आवश्यक आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून तो KID नंबर घ्यावा. तरी अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स सायकलिंग लीग स्पर्धेत सहभागी होण्याचे आव्हान संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. ही लीग दोन गटांमध्ये होणार असून, त्यामध्ये वुमेन ईलिट (खुला गट 2006 पर्यंत) आणि वुमेन्स जूनिअर (ज्युनिर गट मुली जन्म वर्ष 2007,2008) या वर्षी जन्म झालेला असावा.
महिलांना सायकलिंग खेळात प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित सायकलपटूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी अस्मिता खेलो इंडिया उपक्रमांतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जळगांव जिल्ह्यात प्रथमच इतक्या नोठ्या प्रमाणात महिलासाठी सायकलिंग स्पर्धा होत असल्यामुळे खेळाडूसह क्रीडा प्रेमीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या स्पर्धेसाठी राष्ट्रीय सायकलिंग महासंघ, खेलो इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, जिल्हा सायकलिंग असोसिएश जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी जास्तीत जास्त महीला खेळाडू नी रजिस्ट्रेशन करून सहभागी व्हावे आवश्यक त्या सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून, सुरक्षेसाठी ते वैद्यकीय सुविधा, नाष्टा जल पान व्यवस्थे पर्यंत सर्व बाबींचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्यातील अनेक महिला सायकलपटू आपले कौशल्य दाखवण्यासाठी येणार असून, विजेत्यांना सन्मानचिन्ह / मेडल, प्रमाणपत्र तसेच पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पधासाठी संधी मिळणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 9.00 वाजता होणार असून, मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल. जिल्ह्यातील नागरिक, क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेला उपस्थित राहून महिला सायकलपटूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हा सायकलिंग असोसिएशन द्वारे करण्यात आले आहे. नियोजनासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी क्रीडा शिक्षक काम पाहत आहेत. तसेच या स्पर्धेसाठी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे श्री. सुदाम रोकडे हे स्पर्धेचे प्रमुख निरीक्षक म्हणून काम पाहणार आहे.
अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग भुसावळ येथे 15 नोव्हेंबर रोजी महिला सायकलपटूंचा थरार…


























