निफाड, १४ नोव्हेंबर:
वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूल, निफाड येथे बालदिनानिमित्त आज आनंददायी टॅलेंट हंट कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सुप्त कलागुन सादर केले . तबला, पियानो, गायन, नृत्य, कविता वाचन, मिमिक्री इत्यादी विविध कलांची मनमोहक सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले तसेच नर्सरी ,जूनियर , सीनियर या बाल गटातील विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्थेचे परीक्षक म्हणून मा.सौ.भारतीताई कापसे यांनी केले. विद्यार्थ्यानी आत्मविश्वासाने कार्यक्रमात सहभागी होउन कार्यक्रम अधिक रंगतदार केला.
विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणाला उपस्थित पालक वर्ग व विद्यार्थ्यानी भरभरून दाद दिली. प्राचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, असे सांगितले.
शाळा व्यवस्थापन व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून बालदिनाचा कार्यक्रम अधिक संस्मरणीय बनवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.


























