मंठा : (ज्ञानेश्वर पवार)
आंभोडा कदम येथे बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जुन्या लोकांची प्रथा अजून बी कायम ठेवण्यात आलेली दिसून आली. आंभोडा कदम येथे प्राचीन कालीन हनुमान मंदिर आहे या मंदिराच्या परिसरामध्ये अंभोडा कदम मधील गावातील व तांड्यातील शेतकरी बंधूंनी आपापले अहो रात्र कबाड कष्ट करणारे आपले बैल आज रोजी जुलर हार फुगे लावून सजवून ह्या परिसरामध्ये घेऊन येतात एकदम सर्व बैल जमा झाल्याच्या नंतर जसे विवाह प्रसंगी वधू-वरांचा शुभविवाह करण्यासाठीचे मंगलाष्टके म्हणले जातात ते मंगलाष्टके घेऊन बैलावरती अक्षदा टाकून लग्न लावतात.. अक्षदा टाकून झाल्यानंतर मारुतीच्या आजूबाजूने फेरे मारतात फेरे मारून आपले बैलं आपापल्या घरी नेऊन त्यांचे पूजन करतातं.. असा हा सन बारा महिन्यातून एक वेळेस येतो त्यामुळे शेतकरी राजा खूप आनंदात साजरा करतो.






















