बीड प्रतिनिधी
अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ सुनीता नागरे यांना नुकतेच भारतीय मानक सेवा संघटन कोहिनूर एंटरटेनमेंट यांच्याकडून कोहिनूर भारत गौरव सन्मान अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे.
अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या नावावर संस्था करत असलेल्या आदिवासी बांधवांसाठी शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण या कामासाठी आतापर्यंत विविध संस्थांकडून शेकडो राज्यस्तरीय अवॉर्ड पुरस्कार मिळाले आहे त्यातच अजून एक पुरस्काराची भर अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्थेमध्ये पडली आहे
जुहू मयूर हॉल अंधेरी मुंबई येथे भारतीय मानव सेवा संघटन तसेच कोहिनूर एंटरटेनमेंट राजश्री फिल्म प्रोडक्शन यांच्या माध्यमातून कोहिनूर भारत गौरव सन्मान पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक मान्यवर या पुरस्कारा वेळी उपस्थित होते राजश्री वर्मा नॅशनल प्रेसिडेंट आणि फाउंडर प्रोडूसर अँड डायरेक्टर टीव्ही सिरीयल आर्टिस्ट , प्रोडूसर आशिष महेश्वरी राईस ग्रुपचे मधु कुमार राठी जी गणेश अग्रवालजी या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आले
अभिषेक शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष सौ सुनीता नागरे यावेळी राजश्री वर्मा जी यांचे या नावीन्यपूर्ण कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन आभारी देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
पुरस्कारांनी आपण करत असलेल्या सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते आणि त्याचप्रमाणे कार्य करण्यासाठी दहा हत्तींचे बळ मिळते .
हा पुरस्कार माझा एकटीचा नसून आमच्या सोबत काम करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीचा आहे असे उदगार संस्थेच्या अध्यक्षा सौ नागरे यांनी काढले यांनी काढले.






















