बीड प्रतिनिधी। बीड जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बीड मार्फत दिनांक २२ जुलै २०२५ रोजी स्वा. सावरकर महाविद्यालय, बीड आणि र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई या दोन ठिकाणी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर मेळाव्यांमध्ये अनेक उद्योजक त्यांच्याकडील विविध रिक्त पदांसह सहभागी होणार असून रोजगार मेळाव्यामध्ये त्यांचे कडील अनेक पदांकरिता पदभरती करण्यात येणार आहे. याद्वारे जिल्हयातील १०वी/१२वी/ पदवीधर/ बी एस्सी नर्सिंग/ बी.एस.सी. बी.एड / बी.ए. बी.एड / बी.ए. बी.लीब / बी.पी एड / आयटीआय/ आय टि आय (मेकॅनिक)/ पॉलिटेक्नीक डिप्लोमा अशा विविध पात्रता धारक उमेदवारांना गेवराई, बीड, लातुर, नांदेड, छ. संभाजीनगर, जालना येथे नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.
सदर मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी ैैै.rदरुar.स्aप्aेैaब्aस्.ुदन्.ग्ह या संकेतस्थळावर भेट द्यावी.खाजगी क्षेत्रातील विविध रिक्तपदांकरिता रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत (ेंaत्व्-ग्ह-घ्हूीन्गै) घेण्यात येणार असून याकरिता नोकरी इच्छूक उमेदवारांनी २२ जुलै २०२५ रोजी स्वा. सावरकर महाविद्यालय, बीड आणि र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई येथे या रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित रहावे. तसेच मुलाखतीस येताना आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकते नुसार बायोडाटा अर्जाच्या (Rोल्स) प्रती सोबत आणणे गरजेचे आहे.
रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहिती करिता तसेच काही अडचणी असल्यास स्वा. सावरकर महाविद्यालय, बीड येथील मेळाव्याकरीता श्री. जयदत्त इंगोले यांना ९८२२७८१८७६ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. त्याचबरोबर र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई येथील मेळाव्याकरीता श्री. पवन धाबेवार यांना ९०९६८११०११ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी ााँ् एव्ग्त्त् या फेसबुक पेजला फॉलो व लाईक करावे असे आवाहन श्री. सुशिल उचले, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बीड यांनी केले आहे.
२२ जुलै २०२५ रोजी बीड जिल्हयात दोन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन






















