लासलगाव: लासलगाव येथील श्री महावीर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या प्राचार्या पल्लवी चव्हाणके व पर्यवेक्षक शिवाजी धुमाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन कार्याविषयी उपशिक्षक नितीन कापडणीस यांनी माहिती सांगितली. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याविषयी उपशिक्षिका प्रज्ञा काळे यांनी माहिती सांगितली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.सी.सी. प्रमुख राजेंद्र बनसोडे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त संस्थेचे कार्याध्यक्ष जवाहरलाल ब्रम्हेचा, मानद सचिव शांतीलाल जैन, खजिनदार अजय ब्रम्हेचा , संचालक मोहन बरडिया , महावीर चोपडा,अमित जैन, सुनिल आब्बड तसेच संस्थेचे पालक प्रतिनिधी अक्षय ब्रम्हेचा यांनी विनम्र अभिवादन केले.


























