निफाड (दीपक श्रीवास्तव)
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रामध्ये विविध नाविन्यपूर्ण बदल होत आहेत.हे बदल सर्वांनी स्वीकारणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून ज्ञानार्जनाबरोबर मोबाईलच्या युगात क्रीडा क्षेत्रातही आपले नैपुण्य दाखवावे असे प्रतिपादन महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दत्तात्रेय जोंधळे यांनी न्यू इंग्लिश स्कूल,पालखेड येथे सदिच्छा भेटीप्रसंगी व्यासपीठावरून केले.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दत्तात्रेय जोंधळे, उपाध्यक्ष निवृत्तीनाना थेटे,मुख्याध्यापक अशोक शेळके,पुंजाहरी दिघे आदी मान्यवर होते.
पुढे बोलतांना दत्तात्रेय जोंधळे यांनी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र योगदान देऊन ध्येय निश्चित करून यश साध्य करावे तसेच शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम,भौतिक सुविधा,शाळेचा उंचावणारा प्रगतीचा आलेख, गुणवत्ता,अध्यापनातील प्रामाणिकता यांबाबत विस्तृत आढावा घेऊन समाधान व्यक्त केले.
यानंतर आंतरशालेय हिवाळी क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन कार्याध्यक्ष दत्तात्रय जोंधळे,उपाध्यक्ष निवृत्तीनाना थेटे यांच्या हस्ते झाले.यावेळी जोंधळे यांनी विद्यार्थ्यांच्या क्रिकेट सामन्यांचा मनमुराद आनंद घेऊन स्वतः देखील बॅटिंग केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन प्रेरणा मिळाली.
याप्रसंगी मुख्याध्यापक अशोक शेळके,निलेश गवांदे, दीपक देशमुख, हेमंतकुमार होलगडे, सुनंदा दुर्धवळे ,संजय लव्हांगडे, मंगेश कागदे, शैलेश शिखरे, किरण थेटे,राहुल दवते,वैशाली मोते,सागर जाधव,राजेंद्र नाठे, संदीप आहेर, दत्तात्रय पगार, सावन जाधव,संजय कोकतरे, कविता ढोमसे,सारिका पवळे,सुरेश गांगुर्डे, रामदास पवार,नदीम तांबोळी आदींसह विद्यार्थी उपस्थित होते,
पालखेड विद्यालयात सदिच्छा भेटीप्रसंगी कार्याध्यक्ष दत्तात्रेय जोंधळे,उपाध्यक्ष निवृत्तीनाना थेटे समवेत मुख्याध्यापक अशोक शेळके,पुंजाहरी दिघे आदी


























