म्युनिसिपल हायस्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

भुसावळ – नगरपरिषद संचलीत म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्याप्रसंगी अण्णाभाऊ साठे यांना माल्यार्पण करताना शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस व डॉ. प्रदीप साखरे यांनी लोकमान्य टिळक, यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले प्रसंगी शालिनी बनसोडे, नाना पाटील, संजीव चौधरी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. एसटी चौधरी , डॉ.प्रदीप साखरे यांनी व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरला सावकारे यांनी त्यांच्या जिवना विषयी अतिशय मौलिक विचार आपल्या भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नरेंद्र राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी .दीपक भंगाळे, मनोज किरंगे, रेखा सोनवणे ,ज्योती शिरतुरे, संध्या धांडे,अरुण नेटके,लक्ष्मण पवार, निलेश बोराडे, पुनम देवकर , राजू बागुल, मंदाकिनी मोरे, के.डी.चौधरी ,मनोज चौधरी यांनी प्रयत्न केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *