अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार भक्तीचा सोहळा
नाशिक/चांदवड (प्रतिनिधी):
जैन समाजाच्या इतिहासात एक ऐतिहासिक आणि स्वर्णिम क्षण जवळ आला आहे राष्ट्रसंत. प.पू. आचार्य श्री देवनंदीजी गुरुदेव यांचे शिष्य, परम प्रभावक मुनिश्री अमोघकीर्तीजी आणि मुनिश्री अमरकीर्तीजी महाराज (देवयुगल) यांच्या मंगल आगमनानिमित्त नाशिक ते वडाळीभोई दरम्यान तब्बल ५० किलोमीटर लांब भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या यात्रेमुळे संपूर्ण नाशिक जिल्हा ‘णमोकार’ मंत्राच्या घोषाने दुमदुमणार आहे.
असा असेल यात्रेचा मार्ग (१९ ते २१ डिसेंबर)
* १९ डिसेंबर: सकाळी ६:३० वा. आडगाव दादावाडी ते ओझर (सायखेडा फाटा). दुपारी ३:३० वा. कोकणगाव (समर्थ लॉन्स).
* २० डिसेंबर: सकाळी ६:३० वा. कोकणगाव ते बाफणा जैन स्थानक. दुपारी ३:३० वा. खडकजांब.
* २१ डिसेंबर: सकाळी ६:३० वा. खडकजांब ते णमोकार तीर्थ येथे समारोप.
सांस्कृतिक वैभव आणि आकर्षणे
या ५० किमीच्या यात्रेत १०८ फूट लांब धर्मध्वजा, विशेष गुरु रथ आणि चालता-फिरता ‘युवाइंद्र’ मंडप आकर्षणाचे केंद्र असेल. नाशिक ढोल, आदिवासी नृत्य, सायकलिस्ट पथक, लेडीज बँड, बाल वारकरी आणि कार रॅलीसह घोटीच्या महिलांचे लेझिम, मालेगावची ‘तीन पावली’ व लासलगाव-वडाळीभोईच्या महिलांची विशेष सादरीकरणे होतील. संपूर्ण मार्गावर क्रेनद्वारे पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
मान्यवरांद्वारे स्वागत
यात्रे दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष यतीन कदम, खासदार भास्करराव भगरे, आमदार दिलीप बनकर, आमदार राहुल आहेर आणि माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल आदी मान्यवर मुनिश्रींचे स्वागत करतील.
आयोजक आणि नियोजन समिती
या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव समितीचे खालील पदाधिकारी परिश्रम घेत आहेत:
मुख्य आयोजक:
संतोष पेंढारी (अध्यक्ष), नीलम अजमेरा (संयोजक),ब्र. वैशाली दीदी (संघस्थ), महावीर गंगवाल (उपाध्यक्ष), संतोष काला (ट्रस्टी)
राष्ट्रीय प्रचार-प्रसार संयोजक: पारस लोहाडे, विनोद पाटणी व आयोजन समिती.
यात्रा संयोजक:
* प्रमोद लोहाडे, वैभव अजमेरा, राहुल कासलीवाल, भरत ठोळे, अतुल लोहाडे, पंकज बडजाते, अनिल गंगवाल, महेंद्र दगडे.
आर्यिका माताजींचा आज ‘णमोकार तीर्थ’वर मंगल प्रवेश
राष्ट्रसंत देवनंदीजी महाराज यांच्या शिष्या आर्यिका प्रज्ञा श्री माताजी आणि सुज्ञान श्री माताजी यांचा संघ २० डिसेंबर रोजी दुपारी १:०० वाजता सोग्रस फाटा येथून विहार करत ‘णमोकार तीर्थ’ येथे प्रवेश करणार आहे. सूरत, मुंबईसह देशभरातून शेकडो भक्त या ‘अनोखे स्वागत साठी दाखल होत आहेत. १०८ कलशांनी सामूहिक गुरुपूजन आणि गुरुदेव व माताजींच्या मंगल प्रवचनाचा लाभ भाविकांना घेता येईल.
जैन इतिहासात पहिल्यांदाच: नाशिक ते णमोकार भव्य ‘स्वागत यात्रा’

























