उमराणे बाजार समितीत लाल कांद्याची मोठी आवक; ४११३ रुपयांपर्यंत मिळाला भाव

​उमराणे (वार्ताहर):
देवळा तालुक्यातील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषि उत्पन्न बाजार समिती, उमराणे येथे आज, १७ डिसेंबर २०२५ रोजी कांद्याची मोठी आवक पाहायला मिळाली. यामध्ये लाल कांद्याला प्रति क्विंटल ४११३ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला असून, आवक वाढूनही दरात टिकून राहिलेली तेजी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे.
​लाल कांद्याचा भाव आणि आवक
​आज बाजार समितीत लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. ५११ ट्रॅक्टर आणि ४९८ पिकअप अशा एकूण १००९ वाहनांतून लाल कांद्याची आवक झाली.
​कमीतकमी दर: ९०० रुपये
​जास्तीत जास्त दर: ४११३ रुपये
​सरासरी दर: २२५० रुपये
​उन्हाळी कांद्याची स्थिती
​लाल कांद्यासोबतच उन्हाळी कांद्याचीही आवक सुरू आहे. उन्हाळी कांद्यासाठी ३१३ ट्रॅक्टर आणि १५६ पिकअप अशी एकूण ४६९ वाहनांची नोंद झाली.
​सुपर उन्हाळी कांदा: ८०० ते २२२० रुपये (सरासरी १९५० रुपये)
​मिडियम उन्हाळी कांदा: ५०० ते २००० रुपये (सरासरी १७०० रुपये)
​आजच्या लिलावात एकूण १४७८ वाहनांमधून कांद्याची विक्रमी आवक झाली. बाजार आवारात सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. मध्यम आणि चांगल्या प्रतीच्या मालाला अपेक्षित भाव मिळत असल्याचे बाजार समिती सचिव तुषार गायकवाड यांनी दिली असून प्रतवारी करून माल विक्रीसाठी आणावा चांगला भाव मिळतो असे त्यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *