*मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2 सुरू; शेतकरी बांधवाने अर्ज ऑनलाईन करावेत – आकाश गर्जे*

पाटोदा *(गणेश शेवाळे)* मराठवाडातील दुग्ध व्यवसायाला नवे बळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (NDDB) यांच्या सहकार्याने राबविण्यात येणारा विदर्भ–मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचा टप्पा-2 औपचारिकरीत्या सुरू झाला आहे. एकूण 19 जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार असून पशुपालकांना विविध अनुदाने, यंत्रसामग्री आणि उच्च उत्पन्न देणारी दुधाळ जनावरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंबंधी सविस्तर चर्चा झाली. NDDB आणि पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना उच्च दूध उत्पादन करणाऱ्या गाई–म्हशींचे वाटप, बहुवार्षिक चाऱ्यासाठी विशेष अनुदान, इलेक्ट्रिक कडबाकुट्टी मशीन, मुरघास, फॅट आणि SNF वाढविणारे खाद्यपूरक, तसेच आधुनिक दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील स्वयंरोजगाराला मोठी चालना, दुधाळ जनावरांची संख्या वाढ, दूध संकलन वाढ आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची संधी निर्माण होणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील 11 व मराठवाड्यातील 8 अशा एकूण 19 जिल्ह्यांमध्ये दूध संकलनासाठी स्वतंत्र Action Plan तयार करण्यात येत आहे.सरकारने पशुपालकांना आवाहन केले आहे की,प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी आपले अर्ज तात्काळ ऑनलाईन करावेत आशे आवाहन शेतकरी मित्र आकाश गर्जे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *