उमराणे वार्ताहर
उमराणे: महिलांना स्वयंरोजगार आणि सक्षमीकरणासाठी विशेष मोहीम राबवण्याला प्राधान्य देण्यात येईल, तसेच सुरक्षित अल्पबचतीचे महत्त्व आणि सुलभ कर्जपुरवठा यंत्रणा अधिक गतिमान करण्यात येईल, असे प्रतिपादन इंदिरा महिला सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा श्रीमती गीतांजली प्रसाद हिरे यांनी केले. महिला बँकेच्या अध्यक्षपदी अविरोध निवड झाल्याबद्दल टाकळी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.
अध्यक्षपदी एकमताने निवड
इंदिरा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी गीतांजली प्रसाद हिरे यांची संचालक मंडळाच्या बैठकीत एकमxताने निवड करण्यात आली. टाकळी ग्रामस्थ आणि सभासद महिलांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्षा हिरे यांचा भव्य सत्कार सोहळा टाकळी येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना गीतांजली हिरे यांनी आगामी काळात बँकेचे कामकाज अधिक गतिमान आणि लोकाभिमुख ठेवण्याचे निर्देश दिले.
गिरणा कालव्यासाठी प्रयत्न करणार: प्रसाद हिरे
याप्रसंगी भाजपचे नेते प्रसाद हिरे यांनी त्यांच्या भाषणात महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी गिरणा उजवा कालवा निर्मितीत स्व. डॉ. हिरे यांच्या योगदानाचे स्मरण केले. तसेच, आगामी काळात प्रस्तावित उजवा कालवा रुंदीकरण व विस्तारीकरणाचे काम मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची भूमिका जाहीर केली.
मान्यवरांकडून निवडीचे स्वागत
यावेळी सामाजिक कार्यकर्ते कैलास शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. भाजपचे प्रांतिक सदस्य नंदूतात्या सोयगावकर, कैलास बोरसे, संजय वाघ, समाधान शेवाळे, संतोष निकम आदी सर्वपक्षीय नेत्यांनी गीतांजली हिरे यांच्या निवडीचे स्वागत केले आणि बँकेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या सोहळ्यात सामाजिक कार्यकर्त्या वैशाली शेवाळे व सरपंच ग्रामपंचायत सोसायटीच्या महिला सदस्यांचा सत्कार गीतांजली हिरे यांच्या हस्ते करण्यात आला.
उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमाला युवा नेते प्रणवदादा हिरे, मामको बँकेचे संचालक अँड. भरत पोफळे, विठ्ठल बागुल, नितीन पोफळे, लकी गिल, भाजपचे मालेगाव महानगर अध्यक्ष देवा पाटील, भरत कारभारी शेवाळे, मुरलीधर वाघ, माजी पं. स. सदस्य पंकज शेवाळे, भास्कर बच्छाव, निलेश लोढा, संजय बच्छाव, सुरेखा भुसे, बबन बच्छाव, निमजी शेवाळे, रमेश बच्छाव, उत्तमराव बच्छाव, प्रा. आर. आर. सूर्यवंशी, सुरेखा पवार, वैशाली शेवाळे, सनी निकम, देविदास वाघ, अलका वाघ, रवींद्र शेवाळे, शिवाजी पवार, अँड. चंद्रशेखर शेवाळे, समाधान शेवाळे, आर. आर. सूर्यवंशी, भरत अहिरे, विकास वाघ, मुरलीधर वाघ, मनोज शेवाळे, सुनील मांडवडे, देवीदास मांडवडे, सुनिल देवरे, रामराव देवरे, भैया देवरे यांच्यासह टाकळी पंचक्रोशीतील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा बिरारी यांनी केले, तर कैलास शेवाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. बँके’चे नव उपक्रम गीता

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा बिरारी यांनी केले, तर कैलास शेवाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.