( तुषार शिंपी. एरंडोल)
एरंडोल (जळगाव) : येथील रा. ति. काबरे येथे दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी भारताचा ७६ वा संविधान दिवस अत्यंत उत्साहाने व देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथी ऍडव्होकेट श्री.प्रकाश जी बिर्ला आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. शालिक भाऊ गायकवाड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. तसेच शालेय समिती चेअरमन श्री. अनिलभाऊ बिर्ला, संस्थेचे सहसचिव श्री.धीरजभाऊ काबरे,संस्थेचे संचालक श्री. परेशभाऊ बिर्ला व श्री. सतीशभाऊ परदेशी तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस एस राठी सर, उपमुख्याध्यापक श्री. पी. एच. नेटके सर व पर्यवेक्षक श्री. पी. एस. नारखेडे सर उपस्थित होते.श्री. व्हि. टी. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचा अर्थ सांगितले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यर्पण करून संविधान दिवसाच्या घोषणा दिल्या आणि संविधानाचे सामूहिक वाचन केले.अशा जल्लोष पूर्ण वातावरणात संविधान दिवस साजरा करण्यात आला.


























