पाटोदा (प्रतिनिधी) सामाजिक समतेचे प्रतीक व बहुजन समाजासाठी लढा देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने उभारलेला महात्मा फुले चौक, राशीन (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथे काही समाजकंटकांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, समाजात अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
या घटनेचा सावता सेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून, सावता सेनेच्या बीड जिल्हा महिला अध्यक्ष स्वाती कातखडे यांनी संबंधित दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्वाती कातखडे म्हणाल्या, “महापुरुषांचा अपमान करणारे हे समाजकंटक समाजात तेढ निर्माण करत असून, अशांना वेळेवर शिक्षा न झाल्यास जनतेचा संयम सुटेल आणि आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल.”या घटनेमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची शक्यता आहे. म्हणूनच प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून आरोपींना अटक करावी, व अशा घटनांचा पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सावता सेनेच्या महिला बीड जिल्हाध्यक्षा स्वाती कातखडे यांनी केली आहे.
राशीन येथे महात्मा फुले चौकाची तोडफोड करणाऱ्या हरामखोरांवर तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करा स्वाती कातखडे यांची मागणी


























